Chandu Champion Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chandu Champion Collection : सांगलीच्या मुरलीधर पेटकर यांची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'ची एका आठवड्यात कमाई किती ?

Chandu Champion Day 6 Box Office Collection : कबीर खान दिग्दर्शित 'चंदु चॅम्पियन' चित्रपट १४ जूनला रिलीज झालेला आहे. गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या या चित्रपटाचे चाहते कौतुक करीत आहेत.

Chetan Bodke

कबीर खान दिग्दर्शित 'चंदु चॅम्पियन' चित्रपट १४ जूनला रिलीज झालेला आहे. गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या या चित्रपटाचे चाहते कौतुक करीत आहेत. मुरलीधर पेटकर यांची भुमिका अभिनेता कार्तिक आर्यन साकारत आहे. १२० कोटींमध्ये निर्मित झालेल्या ह्या चित्रपटाचे सध्या प्रेक्षकांसह समीक्षकही कौतुक करीत आहेत. एका आठवड्यातच या चित्रपटाने ३३ कोटींची कमाई केलेली आहे, जाणून घेऊया चित्रपटाच्या सहाव्या दिवसाच्या कमाईबद्दल...

१४ जून २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या 'चंदू चँपियन' चित्रपटाने आतापर्यंत ३३ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ४.७५ कोटींची कमाई, दुसऱ्या दिवशी ७ कोटी, तिसऱ्या दिवशी ९.७५ कोटी, चौथ्या दिवशी ५ कोटी, पाचव्या दिवशी ३.२५ कोटी, तर सहाव्या दिवशी ३ कोटींची कमाई झालेली आहे. फक्त देशातच नाही तर परदेशातही चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. चित्रपटाला विकेंडचा फायदा झाला होता. सध्या कमाईमध्ये घट झाली असून पुन्हा एकदा विकेंडला कमाईमध्ये कमाईमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

१२० कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च वसूल करण्यासाठी निर्मात्यांना खूपच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. बायोपिकमध्ये, मुरलीकांत पेटकर यांचा एक सैनिक आणि बॉक्सर होण्यापासून ते गंभीर दुखापतीतून बरा झाल्यानंतर जलतरणपटू होण्यापर्यंतचा थक्क करणारा प्रवास दाखवण्यात आला आहे. मुरलीकांत पेटकर यांनी १९७० साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणि त्यानंतर १९७२ साली जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशाचं नाव उज्वल केलं होतं.

चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करीत असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी केली आहे. चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत भुवन अरोरा, राजपाल यादव, यशपाल शर्मा, विजय राज, अनिरुद्ध दवे, पलक लालवानी आणि इतर कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT, IPL Final : प्रिन्स अन् किंग भिडणार... गुजरातच्या मैदानात आरबीसी कमाल करणार का? पाहा संभाव्य प्लेईंग ११

Pune News: पुण्यात धक्कादायक घटना, विषारी दारूमुळे १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला

Marriage tips : मुलगा कितीही श्रीमंत असला तरी 'या' १ सवयीमुळे मुलीचं आयुष्य होईल उद्ध्वस्त; लग्नाआधीच व्हा सावधान

PSI Transfer : महाराष्ट्रात बदल्यांचा धडाका! ४३ PSI सह ३९९ कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली

SCROLL FOR NEXT