Hum Do Hamare Baarah: 'हमारे बारह' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने दिली परवानगी;काय होता वाद ?

Hum Do Hamare Baarah Movie News: 'हमारे बारह' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली होती.
Hum Do Hamare Baraah
Hum Do Hamare Baarah Saam TV

'हमारे बारह' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील लोकसंख्या वाढीविषयी ठळक वर्णन केले आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने चित्रपट प्रदर्शनावर बंदी घातली होती. मात्र, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 'हमारे बारह' चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायलयाने मंजुरी दिली आहे.

चित्रपटात काही बदल करण्यास निर्मात्यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळेच हमारे बारह चित्रपटाच्या प्रदर्शनास मंजुरी दिली आहे. बदल केल्यानंतर चित्रपट प्रदर्शित करण्यास हरकत न घेण्याचे याचिकाकर्त्यांकडून मान्य करण्यात आले आहे. आज दुपारी १.३० वाजता न्यायालय याबाबत आदेश देणार आहे.

Hum Do Hamare Baraah
Sonakshi Sinha Marriage: सोनाक्षीच्या लग्नामुळे कुटुंबात नाराजी; आईसह भावाने केलं अभिनेत्रीला अनफॉलो; हळदीला उपस्थित राहणार नाही कुटुंब?

'हमारे बारह' या चित्रपटात एका विशिष्ट समाजाला दोष देण्यात आला आहे. त्यामुळे जातीय तेढ टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टाने या चित्रपटावर बंदी घातली होती. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. मात्र, आता चित्रपटात काही बदल करण्यास निर्मात्यांनी होकार दिला आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

चित्रपटात एका समाजाचे आक्षेपार्ह वर्णन केले असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. लोकसंख्या वाढीचे एकदम ठळक वर्णन केले होते. हे सीन्स चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी केली जात होती. यासाठी तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. परंतु आता चित्रपटातील काही सीन्स बदल करण्याची मागणी निर्मात्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनासाठी परवानगी दिली आहे.

Hum Do Hamare Baraah
Disha Patani: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ठरली सर्वाधिक लोकप्रिय; IMdB च्या सेलिब्रिटींच्या साप्ताहिक यादीत अव्वल स्थानावर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com