Hrithik Roshan Injured Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan: चेहरा पडलेला,हातात वॉकिंग स्टिक; हृतिक रोशनला झाली गंभीर दुखापत, व्हिडिओपाहून चाहते चिंतेत

Hrithik Roshan Injured: हृतिक रोशनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. व्हिडिओमध्ये हृतिक वॉकिंग स्टिकच्या मदतीने चालताना दिसत आहे.

Shruti Vilas Kadam

Hrithik Roshan: बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कधी त्याच्या प्रोजेक्ट्समुळे, कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे, किंवा त्याच्या लव्ह लाईफमुळे. आता, हृतिकचा एक व्हिडिओ समोर आला आहे, पण, यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. या व्हिडिओमध्ये हृतिक वॉकिंग स्टिकच्या मदतीने चालताना दिसत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर झपाट्याने व्हायरल झाला आहे.

हृतिक रोशनला काय झालं?

खरंतर, हृतिक रोशनचा हा व्हिडिओ शनिवारी रात्री समोर आला. हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये, हृतिक वॉकिंग स्टिकच्या मदतीने त्याच्या कारकडे चालत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. यावेळी, हृतिक रोशन पापाराझींना भेटलाही नाही.

हृतिकला ही दुखापत कशी झाली किंवा त्याला वॉकिंग स्टिकचा आधार का घ्यावा लागला हे सध्या माहित नाही. पण त्याला होणारा त्रास पाहून चाहते चिंतेत आहे. चाहते त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली, "क्रिश जखमी आहे." दुसऱ्याने लिहिले, "हृतिक रोशनला ही दुखापत कशी झाली?"

हृतिकच्या कामाबद्दल

कामाबद्दल बोलयचे झाले तर, हृतिक सध्या त्याच्या सुपरहिट फ्रँचायझी चित्रपट 'क्रिश ४' मुळे चर्चेत आहे. यावेळी, हृतिक केवळ सुपरहिरो म्हणून पडद्यावर नाही, तर तो दिग्दर्शक म्हणून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विकास गोगावले यांना जामीन मंजूर

Actor Arrested: 'धुरंधर' फेम अभिनेत्याला अटक; घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोप

Ladki Bahin Yojana: १८१ नंबर करा नोट; एक कॉल अन् लाडक्या बहिणींचे सर्व प्रॉब्लेम होतील Solved

'सोंगाड्या'चं नाव देशभर गाजलं; गावगाड्यातील तमाशा सम्राटाला पद्मश्री, रघुवीर खेडकर आहेत तरी कोण?

Kalyan Tourism : शहराच्या गजबजाटापासून दूर 'या' ठिकणी घ्या निवांत विश्रांती, कल्याणजवळील निसर्गरम्य पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT