Famous Singer Death: ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये आज (२५ जानेवारी २०२६) प्रसिद्ध ओडिया संगीतकार व गायक अभिजीत मजुमदार यांचे ५४ वयात निधन झाले. ते दीर्घ काळ गंभीर आजाराशी झगडत होते. त्यांचे AIIMS भुवनेश्वर येथे उपचार घेत असताना आज सकाळी हार्ट अटॅकने त्यांचे निधन झाल्याची माहिती माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्यांना सुमारे ७:४३ वाजता कार्डियाक अॅरेस्ट झाला आणि तत्काळ सीपीआर दिल्या गेल्या, पण ९:०२ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
अभिजीत मजुमदार हे ओडिया संगीत विश्वातील एक आदरणीय व्यक्ती होते. त्यांच्या संगीताने श्रोत्यांच्या मनावर खोल प्रभाव पाडला आणि त्यांनी ओडिशा संगीतसृष्टीत ७०० हून अधिक गाणी तयार केली आहेत. त्यांच्या योगदानामुळे ते ओडिशा आणि ओलिवूड (ओडिया चित्रपटसृष्टी) मधील एक महत्त्वाचे नाव बनले होते.
ओडिशा मुख्यमंत्री मोहन चारण माजी यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहीले, प्रख्यात गायक आणि संगीत दिग्दर्शक अभिजीत मजुमदार यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले आहे. त्यांच्या निधनाने आपल्या संगीत, चित्रपट आणि संस्कृतीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. मी शोकाकुल कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी भगवान चरणी प्रार्थना करतो. ओम शांती.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही कलाकाराच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत म्हटले की, "ओडिशाचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक अभिजीत मजुमदार यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले आहे. आपल्या अनोख्या संगीत शैलीने त्यांनी अनेक दशकांपासून ओडिया श्रोत्यांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांचे अकाली निधन हे ओडिया कलाविश्वासाठी कधीही भरून न येणारे नुकसान आहे. त्यांच्या आत्म्याच्या शाश्वत शांतीसाठी प्रार्थना करताना, मी शोकाकुल कुटुंबियांना माझ्या संवेदना व्यक्त करतो. ओम शांती."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.