Hardik Joshi Saam TV
मनोरंजन बातम्या

Hardik Joshi: 'तुझ्यात जीव रंगला'चा राणादा पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, हार्दिक जोशी घेऊन येतोय नवाकोरा रिअ‍ॅलिटी शो

Hardik Joshi New Show: हार्दिक जोशी लवकरच रिअ‍ॅलिटी शो घेऊन येणार आहे. या शोचा प्रोम देखील समोर आला आहे.

Priya More

Jau Bai Gavat Show:

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली होती. या मालिकेमध्ये राणादाची भूमिका अभिनेता हार्दिक जोशीने साकारली होती. या मालिकेतूनच हार्दिक जोशी (Actor Hardik Joshi) घराघरामध्ये पोहचला आणि त्याला खरी ओळख मिळाली.

या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन आता बरेच दिवस झाले. या मालिकेतील राणादा लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हार्दिक जोशी लवकरच रिअ‍ॅलिटी शो घेऊन येणार आहे. या शोचा प्रोम देखील समोर आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच एक नवीन रिअ‍ॅलिटी शो सुरू होणार आहे. या शोचा प्रोमो ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. ‘जाऊ बाई गावात’ असं या रिअ‍ॅलिटी शोचे नाव आहे. हा गेमिंग शो असणार आहे. या शोच्या माध्यमातून राणादा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. राणादा येणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

काही दिवसांपूर्वी झी मराठीने “करणार तेव्हा कळणार, आता मज्जा येणार…लवकरच खेळ सुरू होणार” असे कॅप्शन देत एक प्रोमो शेअर केला हातो. या प्रोमोमध्ये गावातील विहिरीवर गॉगल लावून पाणी भरणाऱ्या दोन महिला दाखवल्या आहेत. या महिला “करणार तेव्हा कळणार, आता मज्जा येणार…' असं म्हणताना दाखवण्यात आल्या आहेत. हा प्रोमो पाहून सर्वांना प्रश्न पडला होता की नेमकी मालिका येतेय की नवा शो येतोय. पण आता त्यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर उलगडलं आहे. पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘जाऊ बाई गावात’ या हार्दिक जोशीच्या नव्या शोचे नाव जाहीर करण्यात आले.

दरम्यान, 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता हार्दिक जोशी राणादा आणि अक्षया देवधर ही पाठकबाईंच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ही जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या जोडीला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. या मालिकेच्या सेटवरच हार्दिक आणि अक्षया एकमेकांच्या प्रेमात पडले. अचानक दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांसह सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या जोडीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर दोघांचे लग्न झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT