Gashmeer Mahajani Interview Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gashmeer Mahajani Interview: वडिलांच्या निधनानंतर ट्रोल झालेल्या गश्मीरचा सर्वात मोठा खुलासा, २०-२५ वर्षांतील सर्वच गोष्टी सांगितल्या

Gashmeer Mahajani News: गश्मीरने वडीलांच्या निधनाचे कारण एका मुलाखतीच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.

Chetan Bodke

Gashmeer Mahajani Interview

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या आकस्मित निधनामुळे मराठी सिनेसृष्टीत चांगलीच खळबळ उडाली आहे. अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन १५ जुलै रोजी झालं असून दोन दिवसानंतर निधनाचे वृत्त माध्यमामध्ये प्रसिद्ध झाले. सोशल मीडियावर त्यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनीला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. नुकतंच अभिनेत्याने एका युट्यूब चॅनलला वडीलांच्या निधनानंतर मुलाखत दिली आहे. यावेळी गश्मीरने मुलाखतीत वडीलांचं कारण स्पष्ट केलं आहे.

नुकताच अभिनेता गश्मीर महाजनीने ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. यावेळी त्याने मुलाखतीत अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. गश्मीरने वडीलांच्या निधनाचे कारण सांगितले की, “वडीलांचे निधन कार्डियाक अरेस्टने झाले आहे. वडीलांच्या निधनानंतर डॉक्टरांनी सांगितले की, तुम्ही जरी त्यावेळी तिथे असले असते तरी तुम्ही काहीच करू शकले नसते. वडील गेले २०- २५ वर्षांपासून आमच्यापासून दुर राहत ते एकटे राहत होते. पूर्वी ते माझ्यासोबत आणि आईसोबत राहायचे. पण त्यांनी गेल्या साडे तीन वर्षांपासून आमच्या सर्वांसोबतचा संपर्क कमी केला होता.” असं गश्मीरने मुलाखतीत सांगितले.

सोबतच अभिनेता पुढे मुलाखतीत म्हणाला, “वडिलांचा स्वभाव हा खूपच मुडी होता. त्यांना कायमच एकट्यात, एकांतात राहायला आवडायचं. सोबतच त्यांना त्यांची कामं इतर दुसऱ्यांनी कोणी केलेलीही आवडत नव्हतं. आपली कामं आपल्याच हाताने केलेले त्यांना आवडायचे. आम्ही त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी, त्यांचे कामं करण्यासाठी एका केअरटेकरची नियुक्ती केली होती. त्यांना केअरटेकरने सुद्धा केलेले काम आवडत नव्हतं. त्यांच्याजवळ केअरटेकरला पाठवलं की, ते एक- दोन दिवसांतच त्यांना काढून टाकायचे. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही, त्यांनी, जवळचे नातेवाईक आणि त्यांचे मित्र आप्तेष्ट यांच्यासोबत मर्यादित संपर्क ठेवायला सुरुवात केली होती..”

तर पुढे अभिनेता रविंद्र महाजनी म्हणाला, “बाबांनी मला आणि माझ्या आईला ब्लॉक केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविषयीची माहिती आम्ही इतरांकडून घ्यायचो. सोबतच ते माझ्या बायकोचाही फोन उचलत नव्हते. आमचं आणि वडीलांचं एकतर्फी नातं होतं. ज्यावेळी त्यांना आम्हाला भेटण्याची इच्छा व्हायची तेव्हाच ते आम्हाला भेटायला यायचे. त्यांचा स्वभाव मुडी असल्यामुळे जेव्हा त्यांना एकटं राहण्याचं मन होत होतं, तेव्हा ते पुण्यातल्या घरी राहायला जायचे. माझा ज्यावेळी पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा ते आमच्यासोबत काही दिवसांसाठी राहिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

SCROLL FOR NEXT