Ashok Saraf Received Deenanath Mangeshkar Award Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ashok Saraf Speech : "आजवर अनेक अवॉर्ड्स मिळाले, पण आजचा पुरस्कार..."; मंगेशकर पुरस्कारानंतर अशोक सराफांनी व्यक्त केल्या भावना

Deenanath Mangeshkar Award : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आल्यानंतर त्यांनी भावनिक भाषण केलं आहे.

Chetan Bodke

Ashok Saraf Received Deenanath Mangeshkar Award

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये, स्वतःचा ठसा उमटवणारे कलाकार म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) होय. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता त्यानंतर अभिनेते अशोक सराफ यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले. काल म्हणजे २४ एप्रिलला त्यांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (Marathi Actors)

यावेळी सोहळ्यासाठी, मंगेशकर कुटुंबीय, बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन, रणदीप हुड्डा, पद्मिनी कोल्हापुरे, रुपकुमार राठोड, अभिषेक बच्चन, चिन्मय मांडलेकर असे दिग्गज मान्यवर उपस्थित होते. अशोक सराफ यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आल्यानंतर त्यांनी भावनिक भाषण केलं आहे.

आपल्या भाषणामध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणाले, "नमस्कार, इतक्या आनंदाने आणि प्रेमाने तुम्ही इकडे जमलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. स्टेजवरचे म्हणजे आपण वर्णन करू शकत नाहीत असे थोर कलावंत बसले आहेत. त्यांच्या रांगेत मी बसलोय यांच्यासमोर माझा सन्मान होणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आजवर मला अनेक अवॉर्ड्स मिळाले आतापर्यंत इतके मी मला मोजता येत नाहीत आणि आठवतही नाहीत. पण आजचा पुरस्कार माझ्यासाठी फार महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे." (Marathi Film)

"आनंदाची म्हणजे परिसीमा झालीये असं मला वाटतं. मी एक कलाकार आहे आणि एका असामान्य गायक कलाकाराच्या म्हणजेच मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार एका असामान्य परिवाराकडून हा पुरस्कार मला मिळतोय. आज इथे एक मोठा असामान्य नटाच्या उपस्थितीत मिळतोय ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ही सगळ्यात मोठी आणि माझ्या कायम लक्षात राहणारी गोष्ट आहे. हा सन्मान फक्त माझा नाहीये, तर तुमच्या सगळ्यांचा सन्मान आहे. कलाकार हा फक्त काम करतो." (Marathi Film Industry)

"तो वेगवेगळे प्रयोग करतो, पण ते प्रयोग तुम्हाला पटले नाहीत तर त्याचा काहीच उपयोग नाही. पण, मी केलेलं काम तुम्हाला आवडलं, तुम्ही दरवेळी त्याबद्दल तुमच्या भावना व्यक्त केल्या यासाठी मी तुमच्या सगळ्यांचा ऋणी आहे. आज मी हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटूंबीयांचे आभार मानतो की, त्यांनी मला या पुरस्काराच्या लायक समजलं. माझी एवढ्या वर्षांची तोडकी मोडकी सेवा त्यांनी समजून घेतली. त्यासाठी मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. हा क्षण माझ्या हृदयात राहील आणि मी कधीही विसरू शकणार नाही" (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Tendulkar Son : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झाला; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सून?

Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेत वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

SCROLL FOR NEXT