Ashish Warang  x
मनोरंजन बातम्या

Actor Death : लोकप्रिय अभिनेत्याचे निधन, वयाच्या ५५ व्या वर्षी मालवली प्राणज्योत

Ashish Warang Death : मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. अभिनेते आशिष वारंग यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाले आहे. मराठीसह हिंदी सिनेमांमध्ये ते झळकले होते.

Yash Shirke

  • लोकप्रिय अभिनेते आशिष वारंग यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाले.

  • मराठीसह हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले होते.

  • त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

Ashish Warang : मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेते आशिष वारंग यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. आशिष यांचे भाऊ अभिजीत वारंग यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. आशिष वारंग हे मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये झळकले होते. सूर्यवंशी, सिंबा, सर्कस, मर्दानी अशा अनेक हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी काम केले.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगामुळे निधन झाले. त्या धक्क्यातून सावरत असताना मनोरंजन सृष्टीला आणखी एक धक्का बसला आहे. मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते आशिष वारंग यांची प्राणज्योत मालवली आहे. ते मागील काही काळापासून आजारी होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आशिष वारंग यांचे बंधू अभिजीत वारंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिजीत यांनी 'आशिष दादा, आम्ही तुला नेहमी खूप मिस करु. आधी तू हवाई दलात अधिकारी म्हणून देशाची सेवा केलीस आणि नंतर अभिनय कौशल्याने मनं जिंकलीस', असे म्हटले आहे.

आशिष वारंग यांच्या अभिनयाचा प्रवास खूप खास होता. सिनेसृष्टीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून देशाची सेवा केली होती. त्यानंतर त्यांनी अभिनयक्षेत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली. रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' चित्रपटात ते 'आशिष तांबे' या भूमिकेत दिसले होते. सूर्यवंशी व्यतिरिक्त एक व्हिलन रिटर्न्स, दृश्यम, सिंबा, सर्कस, मर्दानी अशा चित्रपटांमध्ये आशिष यांनी काम केले. याशिवाय ते प्रसिद्ध वेब सिरीज 'द फॅमिली मॅन' मध्येही झळकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk : दूध फाटलं? नो टेंन्शन! 'अशा' ५ प्रकारे करा वापर, भन्नाट ट्रिक आताच लिहून घ्या

Chhatrapati shivaji maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ चित्र पाहिलीत का? बघा जगभरातील वस्तूसंग्रहालयात जतन केलेली चित्र

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Ajit pawar Death : रोहितची काळजी वाटते, सरकारने सुरक्षेची जबाबदारी घ्यावी; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kalyan : कल्याणमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, दोघे गंभीर जखमी; परिसरात तणावपूर्वक वातावरण

SCROLL FOR NEXT