Actor Rishabh Tandon Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Death: प्रसिद्ध अभिनेता अन् गायकाचे हार्ट अटॅकने निधन, शेवटची पोस्ट चर्चेत

Actor Rishabh Tandon: प्रसिद्ध अभिनेता आणि गायक ऋषभ टंडनचे निधन झालं. तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचं निधन झालं. त्याच्या निधनामुळे फिल्म इंडस्ट्रीसह चाहत्यांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला.

Priya More

Summary:

  • प्रसिद्ध अभिनेता आणि गायक ऋषभ टंडनचे निधन

  • दिल्लीमध्ये कुटुंबीयांना भेटायला गेले असता घडली घटना

  • तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने ऋषभ टंडनचे निधन

फिल्म इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि गायक ऋषभ टंडनचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने ऋषभचं निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या निधनाचे वृत्त कळताच फिल्म इंडस्ट्रीसह चाहत्यांना मोठा धक्का बसला. सर्वजण सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फकीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गायक ऋषभ टंडनचे २१ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ऋषभ कुटुंबीयांना भेटण्यासाठी दिल्लीला गेला होता. त्याचवेळी त्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले. ऋषभच्या जवळच्या मित्राने त्याच्या निधनाचे वृत्त सांगितले. ऋषभ टंडन हा मुंबईमध्ये राहत होता. तो प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि अभिनेता होता.

प्रसिद्ध संगीतकार ऋषभ टंडनच्या निधनाने इंडस्ट्रीवर आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. चाहते सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. गाण्यांव्यतिरिक्त ऋषभने टंडन 'फकीर - लिव्हिंग लिमिटलेस' आणि 'रुष्ना: द रे ऑफ लाईट' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. एक उत्तम गायकासोबतच तो उत्तम अभिनेता देखील होता.

ऋषभ इन्स्टाग्रामवरही खूप सक्रिय होता. इन्स्टावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर ४,४९,००० फॉलोअर्स होते. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटनुसार तो भगवान शिवाचा एक महान भक्त होता. तो एक गायक, संगीतकार आणि अभिनेता देखील होता. त्याचे "इश्क फकीराना" हे गाणे खूप गाजले होते. एका आठवड्यापूर्वी ऋषभने त्याचा वाढदिवस पत्नीसोबत मोठ्या थाटामाटात साजरा केला होता.

सोशल मीडियावर अभिनेता ऋषभची शेवटची पोस्ट देखील त्याच्या वाढदिवसाचीच होती. ही पोस्ट ऋषभच्या पत्नीने अपलोड केली होती. तिने नंतर ती त्याच्या इन्स्टाग्रामवर पुन्हा शेअर केली. त्यामध्ये ऋषभ आणि त्याची पत्नी एक सुंदर पोज देताना दिसत आहेत. या व्हिडिओतून ऋषभ आणि त्याची पत्नी ओलेसिया यांच्यातील प्रेम दिसून येते. ऋषभच्या अचानक निधनामुळे त्याच्या पत्नीसह कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

पवार-ठाकरेंना हवी मनसे? काँग्रेसला राज ठाकरे नकोसे?

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शिंदेसेनेनं दिला धक्का

SCROLL FOR NEXT