BJP MLA Death: भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांचे निधन, ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

MLA Shivaji Kardile: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन झाले. ६७ व्या वर्षी अल्पशा आजारामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली.
BJP MLA Death: भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांचे निधन, ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
BJP MLA DeathSaam Tv
Published On

Summary -

  • भाजप आमदार शिवाजी कर्डीले यांचे ६७ व्या वर्षी निधन

  • राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते

  • सरपंच ते मंत्री असा त्यांचा दीर्घ राजकीय प्रवास राहिला

  • त्यांच्या निधनाने अहमदनगर जिल्ह्यात शोककळा पसरली

सचिन बनसोडे, अहिल्यानगर

भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डीले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार होते. अहिल्यानगर शहाराजवळ असणाऱ्या बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा अशा पक्षातून त्यांनी कामं केली. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळासह अहिल्यानगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

शिवाजी कर्डिले हे २००९ मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. २०१४ ला पुन्हा त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

BJP MLA Death: भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांचे निधन, ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
BJP Leader Killed : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

आमदार शिवाजी भानुदास कर्डीले यांचा दूध व्यवसाय हा मूळ व्यवसाय होता. २०१४ च्या निवडणुकीत शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती. अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते. अल्पशा आजारामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

BJP MLA Death: भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांचे निधन, ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

दरम्यान, गुरूवारी दुपारी तीन वाजता आमदार शिवाजी कर्डीले जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील निवास्थानी शिव महापुराण कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळीही त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे दिसत होते. माजी खासदार सुजय विखे पाटील हे कर्डिले यांचा हात धरून पायऱ्या उतरवताना दिसले. याचा व्हिडीओ समोर आला असून तो आता व्हायरर होत आहे.

BJP MLA Death: भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांचे निधन, ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बडा नेता मशाल सोडून कमळ हाती घेणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com