Asrani Death: प्रसिद्ध विनोदी अभिनेते असरानी यांचे निधन, वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Govardhan Asrani Dies: बॉलिवूडमधील ज्येष्ठ विनोदी अभिनेते असरानी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या प्रतिष्ठित विनोदी भूमिकांसाठी ते प्रसिद्ध होते.
Actor Asrani Death
Bollywood mourns the loss of legendary comedian Asrani, who passed away at the age of 84.saamtv
Published On

प्रसिद्ध कॉमेडी अभिनेते असरानी यांचे आज निधन झाले. हे ज्येष्ठ अभिनेते बऱ्याच काळापासून आजारी होते. आज दुपारी ३ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. असरानी यांचे पूर्ण नाव गोवर्धन असरानी होते. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज २० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता त्यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.

असरानी यांना फुफ्फुसांची समस्या होत होती. ते गेल्या पाच दिवसांपासून आरोग्य निधी रुग्णालयात उपचार घेत होते. दरम्यान असरानी यांचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी असरानी यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. असरानी यांची प्रकृती अनेक दिवसांपासून खराब होती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असं थिबा यांनी माध्यमांना सांगितलं.

Actor Asrani Death
Musician Passes Away: जगप्रसिद्ध संगीतकार काळाच्या पडद्याआड; संगीतविश्वावर शोककळा

असरानी यांच्या अचानक निधनाने चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत शेकडो चित्रपटांमध्ये काम केले आहे.असरानी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे झाला. त्यांनी जयपूरमधील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी राजस्थान कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. १९६७ मध्ये 'हरे कांच की चुडियाँ' या चित्रपटाद्वारे असरानी यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com