Breathe Into The Shadows 2 Trailer Out Instagram @breatheamazon
मनोरंजन बातम्या

Breathe Into The Shadows 2 Trailer: क्रूरतेचा नवा अवतार घेऊन 'जे' परत येतोय... अभिषेक बच्चनची नवीन वेबसीरीज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Breathe Into The Shadows 2 Trailer Out: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अमित साध यांच्या बहुप्रतिक्षित वेबसीरीज 'ब्रेथ - इनटू द शॅडोज 2' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चाहते या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. वेबसीरीजचा हा दुसरा सीझन अधिक उत्तम बनविण्यासाठी निर्मात्यांनी बरेच प्रयत्न केले आहेत. ट्रेलर पाहून चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. अल्पावधीतच हा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

'ब्रेथ - इनटू द शॅडोज 2' ही वेबसीरीजमध्ये तुम्हाला भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये तुम्ही पाहू शकता की पूर्वीपेक्षा अधिक क्रूरता या सीझन दाखविण्यात आली आहे. ट्रेलर खूपच धमाकेदार आहे. अभिषेक बच्चन आणि अमित साध दोघेही अप्रतिम अभिनय या सीझनमध्ये दिसणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शन मयंक शर्मा यांनी केले आहे. ब्रेथच्या नवीन सीझनचे लेखन अर्शद सय्यद, विक्रम तुली, प्रिया सग्गी आणि अभिजित देशपांडे यांनी केले आहे. (Web Series)

'ब्रेथ: इनटू द शॅडोज' सीझन 2 चा ट्रेलर पहिल्या सीझनच्या शेवटापासून सुरू झाला आहे. म्हणजेच जिथून ते संपले तिथून सुरू झाले आहे. अर्थात अभिषेक बच्चन 6 पीडितांना पकडण्याचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी परतला आहे. कबीर म्हणजेच अमित साध आपले जुने प्रयत्न पूर्ण करण्यात मग्न आहे. या सीझनमध्येही भरपूर अॅक्शन दाखवण्यात आली आहे. संपूर्ण सीझनमध्ये गुन्हेगारी आणि थ्रिल या दोन गोष्टी प्रामुख्याने दिसणार आहेत. (Trailer)

अविनाश ही दुहेरी व्यक्तिमत्त्व असलेला व्यक्ती आहे. जो मध्येच 'जे' बनतो. 'जे' खूपच हुशार आहे. 'ब्रेथ - इनटू द शॅडोज 2' मध्ये नित्या मेनन अविनाशची पत्नी आभा सभरवालच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचबरोबर सैयामी खेरही एका दमदार व्यक्तिरेखेत दिसत आहे. या भागात काही नवीन पात्रही दिसत आहेत. ही सीरीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सीरीजमध्ये 8 भाग आहेत. ही वेबसीरीज 9 नोव्हेंबर, 2022 रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

Maharashtra News Live Updates: दोन हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

Mahayuti News : महायुतीच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला, 40 उमेदवारांची घोषणा?

SCROLL FOR NEXT