Abhijeet Bhattacharya on Mahatma Gandhi Saam tv
मनोरंजन बातम्या

Abhijeet Bhattacharya: अभिजीत भट्टाचार्य यांचे महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "खरं तर ते पाकिस्तानचे राष्ट्रपिता.."

Abhijeet Bhattacharya on Mahatma Gandhi: अभिजीत भट्टाचार्य यांनी 'महात्मा गांधी हे भारत नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते', असे वक्तव्य केले. याशिवाय त्यांनी गांधींची तुलना पंचमा दा यांच्याशी केली.

Saam Tv

Abhijeet Bhattacharya: सिनेसृष्टीमध्ये गायक अभिजीत भट्टाचार्य फार प्रसिद्ध आहेत. गायनाव्यतिरिक्त वादग्रस्त वक्तव्यामुळे ते सतत चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका पॉडकास्ट चॅनलला भेट दिली होती. पॉडकास्टमध्ये त्यांनी महात्मा गांधी हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तेव्हा बोलताना त्यांनी महात्मा गांधी आणि पंचम दा यांची तुलना देखील केली.

पत्रकार शुभांकर मिश्रा यांच्या पॉडकास्ट चॅनेलला अभिजीत यांनी भेट दिली. पॉडकास्ट सुरु झाल्यावर शुभांकर यांनी पंचम दा म्हणजेच आर. डी. बर्मन यांच्याविषयी पहिला प्रश्न केला. "सध्याची तरुणांना पंचम दा सारख्या महान कलाकाराबद्दल कमी माहिती असते. पंचम दा आणि बाकी अन्य संगीतकारांमध्ये काय फरक आहे, पंचम दा इतके का महान आहेत", असा प्रश्न शुभांकर यांनी विचारला.

त्यावर उत्तर देताना अभिजीत यांनी महात्मा गांधीच्या नावाचा उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, "नेहरु कोण होते? गांधी कोण होते? महात्मा गांधीपेक्षा श्रेष्ठ पंचम दा होते. पंचम दा संगीताचे राष्ट्रपिता होते. महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते. भारत तर आधीपासूनच होता. पाकिस्तानची निर्मिती झाली ना.. पाकिस्तान तयार झाला आणि चुकून त्यांना भारताचे राष्ट्रपिता बनवण्यात आले. खरं पाहायला गेलं गांधी पाकिस्तानचे जन्मदाता होते. ते पाकिस्तानचे सर्वकाही होते."

अशाच वादग्रस्त गोष्टींमुळे अभिजीत भट्टाचार्य प्रकाशझोतात असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी दुआ लिपा भारतामध्ये कॉन्सर्टनिमित्त आली होती. तेव्हा मुंबई कॉन्सर्टमध्ये दुआने आपल्या गाण्यासह शाहरुख खानच्या 'बादशाह' चित्रपटातील गाण्यावर डान्स केला. तेव्हा दुआने वापरलेलं गाणं मी गायलं आहे आणि मला त्याचं क्रेडिट दिलं नाही असे अभिजीत यांनी म्हटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

SCROLL FOR NEXT