Dua Lipa जेव्हा 'वह लडकी जो..' गाते; विदेशी गायिकेच्या गाण्यावर पडला टाळ्या आणि शिट्ट्यांचा वर्षाव

Dua Lipa: गायिका दुआ लिपाचा मुंबईत लाईव्ह कॉन्सर्ट झाला. या कॉन्सर्टमध्ये तिने शाहरुख खानच्या एका गाण्यावर मॅशअप सादर केलं. तिच्या या सादरीकरणाचा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.
Dua Lipa In Mumbai
Dua Lipa
Published On

गायिका दुआ लिपाच्या गाण्याचे जगभरात चाहते आहेत. या गायिकेचा मुंबईमध्ये एक शो होता. या कॉन्सर्टमध्ये तिने लाईव्ह परफॉर्म करत अनेक गाणी सादर केली. तिच्या या कॉन्सर्टसाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक जमले होते. इंग्रजीत गाणे गाणाऱ्या दुआ लिपाने मुंबईत आल्यानंतर बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध गाणं सादर केलं. हे गाणं ऐकताच प्रेक्षकांनी एकच कल्लोळ केला. टाळ्या आणि शिट्ट्या वाजत तिचं कौतुक केलं. तिने हिंदी गाण्यावर मॅशअप केल्याने तिने प्रेक्षकांची मने जिंकली.

दुआ लिपा ही मूळची इल्बानियाची असून तिची गाणी इंग्रजी भाषेत असतात. पण तिने आपल्या या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानचं गाणं असलेलं एक मॅशअप सादर केलं. तिच्या या सादरीकरणाने सगळे प्रेक्षक अचंबित झाले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मुंबईतील कॉन्सर्टमध्ये दुआ लिपाने तिचं लेव्हिटेटिंग हे जगप्रसिद्ध गाणं सादर केलं. हे गाणं ऐकताना प्रेक्षकही दंग झाले होते.

Dua Lipa In Mumbai
Rashmika-Allu Arjun: पुष्पा अन् श्रीवल्लीचा स्वॅगच भारी! 'अंगारो सा' गाण्यावर थिरकले; पुन्हा जिंकली चाहत्यांची मने, पाहा VIDEO

प्रेक्षकही तिच्यासोबत गात होते. मात्र मध्येच काही सेकंदांसाठी थांबून तिने थेट शाहरूख खानच्या बादशाह या चित्रपटातील 'हा यहाँ कदम कदम पर लाखो हसिनायें है' हे गाणं चालू केलं. तिने लेव्हिटेगिं आणि 'वह लडकी जो सबसे अलग है' या दोन्ही गीतांचं मॅशअपच सादर केलं. तिच्या या अनपेक्षित सादरीकरणामुळे सगळे प्रेक्षक अचंबित झाले.

Dua Lipa In Mumbai
Allu Arjun : अल्लू अर्जुनचं मराठी ऐकलंत का? व्हिडीओनं सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ

तिच्या या अनपेक्षित सादरीकरणामुळे सगळ्याच प्रेक्षकांना चांगलाच आनंद झाला. मॅशअपमध्ये शाहरुख खानच्या चित्रपटातील गाणे ऐकताच प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा वर्षाव केला. दुआ लिपा कॉन्सर्टसाठी आपल्या संपूर्ण टीमसह मुंबईत दाखल झाली होती. तिने या कॉन्सटदरम्यान अनेक धडाकेबाज गाणी सादर केली. गाणी, नृत्य यांचा मेळ साधत तिने आपल्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. जगभरात दुआ लिपाची क्रेझ आहे. तिला एकदा पाहण्यासाठी तिचे चाहते जीवाचं रान करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com