Abdu Rozik In Khatron Ke Khiladi 13 Instagram
मनोरंजन बातम्या

Abdu Rozik In Khatron Ke Khiladi 13: शिव ठाकरे- अब्दू पुन्हा एकत्र..! अब्दूही जाणार खतरों के खिलाडी १३ मध्ये? झुरळासोबतचा फोटो टाकून दिली गुड न्यूज

Khatron Ke Khiladi 13 Latest Update: बिग बॉस फेम अब्दू रोझीकने सोशल मिडियावर झुरळासोबतचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमुळे तो खतरों के खिलाडी १३ मध्ये जाण्याची शक्यता आहे.

Chetan Bodke

Abdu Rozik Part Of Khatron Ke Khiladi 13: बिग बॉस फेम अब्दू रोझिक हा बिग बॉस १६मुळे बरेच चर्चेत आलेले नाव. कार्यक्रम संपून अनेक दिवस झाले तरी, अभिनेत्याची क्रेझ चाहत्यांमधून कमी झालेली नाही. बिग बॉस १६ पासूनच त्याच्या चाहत्यांमध्ये खूपच वाढ झाली आहे. नेहमीच चर्चेत राहणारा अब्दू रोझिक यावेळी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अब्दूने त्याच्या इन्स्टग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी त्याला खतरों के खिलाडी १३व्या पर्वात जातोय की काय अशी चर्चा होत आहे.

बिग बॉस १६ च्या शेवटच्या आठवड्यात निर्माता रोहित शेट्टीने हजेरी लावली होती. त्यावेळी रोहितने स्पर्धकांना अनेक वेगवेगळे टास्क करायला लावले होते. त्यातून अनेक स्पर्धकांना खतरों के खिलाडी १३ ची ऑफर दिली होती. सध्या खतरों के खिलाडी १३ ची शूटिंग दक्षिण अफ्रिकेतील केप्टाऊनमध्ये सुरू असून शिव ठाकरे, डेझी शाह, शिझान खान, अर्चना गौतम सोबत अनेक स्पर्धक यामध्ये सहभागी झाले आहेत. अशातच आता अब्दु रोझिकनेही खतरों के खिलाडी १३मध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. अब्दू रोझिक हा खतरों के खिलाडी १३ मध्ये दिसणार आहे. तो जूनमध्ये केप टाउनला जाण्याची शक्यता आहे.

अब्दू रोझिक दिसणार खतरों के खिलाडी १३ मध्ये

अब्दू हा याआधी बिग बॉस १६ मध्ये दिसला होता. त्याचा चाहतावर्ग हा खूप मोठा आहे. त्याने इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे. तो या फोटोत झुरळासोबत दिसत आहे.त्यामुळे त्याच्या खतरों के खिलाडीमध्ये येण्याच्या चर्चांना उधाण आल आहे. त्याचा पोस्टवर कमेंटच्या माध्यमातून चाहत्यांनी खतरों के खिलाडीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Bollywood News)

अब्दूने पोस्टमध्ये नेमक काय म्हटलयं?

अब्दूने इन्स्टाग्रामवरुन झुरळ हातात घेऊन असलेला फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अब्दूने काळ्या रंगाचा टी शर्ट त्यावर लाल रंगाचा जॅकेट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. कॅप्शनमध्ये त्याने "पुढच्या रिॲलिटीशोसाठी प्रॅक्टिस करतोय. तुम्ही सर्व तयार आहात का ?"अस लिहल आहे.पोस्टवर शिव ठाकरेने कमेंटही केली आहे.त्यात तो म्हणाला की,"लवकर ये,वाट पाहतोय अब्ड्या." (Bollywood Actor)

खतरों के खिलाडीमधील स्पर्धक

खतरों के खिलाडी हा एक रिॲलिटी शो आहे. या कार्यक्रमाचे १२ पर्व झाले आहेत. आता १३व्या पर्वाचं शुटींग दक्षिण अफ्रिकेतील केप टाउनमध्ये सुरू आहे. यात १४ सदस्य आहेत. डेझी शाह,अरजित तनेजा,शीझान खान,रुही चतुर्वेदी,रोहित बोस रॉय,रशमित कौर,अनजुम फाकीह,अंजली आनंद, शिव ठाकरे,सौंदास मुफाकीर,नायरा बॅनर्जी,अर्चना गौतम, ऐश्वर्या शर्मा आणि डिनो जेम्स याप्रमाणे सदस्यांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT