Aamir Khan Aamir Shahrukh Salman
मनोरंजन बातम्या

Aamir Khan : सलमान-शाहरुख-आमिर एका चित्रपटात दिसणार? आमिर खानचे 'ते' वक्तव्य चर्चेत

Aamir Shahrukh Salman : नुकत्याच झालेल्या एका मीडिया मुलाखतीत आमिर खानने सलमान आणि शाहरुखसोबत काम करण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडचे तीन खान कायम त्यांच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. नुकताच शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सलमान खान (Salman Khan) आमिर खानच्या (Aamir Khan ) घरी जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या तिघांना कायम आपल्या चित्रपटामुळे लोकप्रियता मिळत गेली. मात्र आजवर या तिघांनी देखील कधीच एक चित्रपट एकत्र केला नाही. त्यामुळे ते कायम चर्चेत असतात. या तिघांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांना खूप इच्छा आहे.

नुकताच आमिर खानने एक मिडिया मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला सलमान-शाहरुख-आमिर एकत्र चित्रपटाबद्दल प्रश्न करण्यात आला. त्यावेळी आमिरने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. आमिर खान नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.

आमिर मुलाखतीत म्हणाला की, "मी आतापर्यंत शाहरुख खानसोबत काम केले नाही. आम्हा तिघांना एकत्र काम करायला खूप आवडेल. फक्त स्क्रिप्ट चांगली असायला पाहिजे. आम्ही तिघांनी याबाबत अनेक वेळा चर्चाही केल्या आहेत. पण ते थोडे कठीण आहे, कारण तीन अभिनेत्यांचा सिनेमा असणे हे पाहायला मिळत नाही. पण असा चित्रपट झाला तर आम्हा तिघांनाही खूप आवडेल."

पुढे आमिर म्हणाला, "आम्हाला आनंदच आहे. आजवर आम्ही कधीच एकत्र काम केले नाही. त्यामुळे आम्हाला काम करताना मजा येईल. चित्रपट चांगला बनेल किंवा वाईट बनेल. मात्र लोकांना देखील चित्रपटात आम्हाला एकत्र पाहायला खूप आवडेल."

आमिर खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याने आपल्या वाढदिवसाला गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची ओळख करून दिली. तर सलमान खान त्या आगामी चित्रपट 'सिकंदर'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदान्ना झळकणार आहे. 'सिकंदर' चित्रपट 30 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर शाहरुख खान त्याची लेक सुहाना खानसोबत 'किंग' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Business Idea: कार नसतानाही करा OLA-Uberसोबत व्यवसाय; दरमहा कमवा बक्कळ पैसा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Banana Chips: वेफर्स खाताय सावधान! तुम्ही खाताय सडलेल्या केळीचे वेफर्स

Mumbai Ahmedabad Bullet Train: समुद्राखालून ३२० किमी वेगाने धावेल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, जाणून घ्य कसा असेल मार्ग

Shocking : ३१ वर्षांच्या तरुणाने केली हद्दपार, १००० महिलांसोबत शरीरसंबध, पण आता...; जगभरात होतेय चर्चा

NEET Exam: 'नीट'चं टेन्शन, विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन; विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

SCROLL FOR NEXT