Maharaj Movie Poster: आमिर खानचा मुलगा बनला 'महाराज', चित्रपटातील जुनैद खानचा फर्स्ट लूक आऊट
Junaid Khan's Poster From Maharaj Movie Saam TV
मनोरंजन बातम्या

Maharaj Movie Poster: आमिर खानचा मुलगा बनला 'महाराज', चित्रपटातील जुनैद खानचा फर्स्ट लूक आऊट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असतो. आमिरनंतर आता त्याचा मुलगा जुनैद खान (Junaid Khan) चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. जुनैद खान महाराज या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. आमिर खानच्या मुलाचा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

'महाराज' (Maharaj) हा चित्रपट १४ जून रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात जुनैद, शर्व वाघ, जयदीप अहलावत, शालिनी पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आज चित्रपटाचं पहिलं पोस्ट रिलीज करण्यात आलं आहे.

चित्रपटाचे निर्माता सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. हा चित्रपट 1800 च्या दशकातील आहे. १८६२ सालच्या काळातील हा चित्रपट आहे.

हा चित्रपट करसनदास मुळजी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. मुळजी हे पत्रकार, समाजसुधारक, महिला हक्क, सामाजिक सुधारणांसाठी काम करणारे वकील होते. ते एल्फिस्टन कॉलेजमधील विद्यार्थी होते. ते दादाभाई नौरोजी यांच्याजवळ आश्रय घेत होते. त्यांनी विधवा पुनर्विवाहावर लिखाण केले आहे. त्यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. त्यांनी समाजासाठी जे काम केलं आहे, ते चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates: वरळी हिट अँड रन प्रकरणी पोलिसांना झटका; राजेश शहा यांची अटक कोर्टाने ठरवली बेकायदेशीर

Wagh Nakh Video: लंडनमध्ये नाही, शिवरायांची वाधनखं साताऱ्यातच; इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांचा दावा

Mumbai Malad Subway News: मालाडच्या सबवेत पाण्याखाली अडकली कार, Viral Video

Genelia Deshmukh: लाजली अन् खुदकन् हसली...

VIDEO: Uttar Pradesh मध्ये तरुणाचा रेल्वेच्या तुटलेल्या पुलावरुन जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT