Imran Khan News: 'माझ्या वाईट काळात...' इम्रान खानने ५ वर्षांनी सांगितलं अवंतिकासोबतच्या घटस्फोटामागचं कारण

Imran Khan On Divorce With Avantika: बॉलिवूड अभिनेता इम्रान खान नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. इम्रान खानने नुकत्याच एका मुलाखतीत अवंतिकासोबतच्या घटस्फोटामागचे कारण सांगितले आहे.
Imran Khan On Divorce With Avantika
Imran Khan On Divorce With AvantikaSaam Tv

बॉलिवूड अभिनेता इम्रान खान हा त्याच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. इम्रान खानने २०११ मध्ये अवंतिका मलिकसोबत लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर २०१९ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. यानंतर त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु होती. दरम्यान, इम्रान खानने स्वतः अवंतिकासोबत घटस्फोटामागील कारण सांगितले आहे.

इम्रान खानने नुकतीच इंडिया टुडेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने अवंतिकासोबत घटस्फोट का घेतला? याबाबत माहिती दिली आहे. इम्रान खान म्हणाला, 'मला याबाबत जास्त काही बोलायचे नाहीये. यामुळे लोकांना गॉसिंपिंगचा एक विषय मिळेल. जेव्हा मी संकटातून जात होतो. माझ्या आयुष्यात संघर्ष करत होतो. त्या काळात मला माझे लग्न आणि माझ्या नात्याने कोणतीही साथ दिली नाही. दोन लोकांमधील आदर्श, एकमेकांना समजून घेणे हे त्या नात्याला मजबूत बनवतो. परंतु आमच्यात असं काहीही नव्हते'. माझ्या वाईट काळात आम्ही एकमेकांसोबत उभे नव्हतो. त्यामुळेच त्यांचा घटस्फोट झाला आहे.

Imran Khan On Divorce With Avantika
Ayesha Khan On War: रफाहमधील तो व्हिडिओ पाहिला अन्...; अभिनेत्री आयशा खान युद्धाचा निषेध करत ढसाढसा रडली; व्हिडिओ केला शेअर

अवंतिका आणि इम्रान २०१९ पासून वेगळे राहत होते. मात्र, याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नव्हती. २०२१ त्या दोघांना घटस्फोट झाला. सध्या इम्रान खान लेखा नावाच्या मुलीला डेट करत आहे. इम्रान खान आणि अवंतिकाला इमारा नावाची मुलगी आहे. इमारा सध्या अवंतिकासोबत राहते. इम्रान खान गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. त्याने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Imran Khan On Divorce With Avantika
Tharla Tar Mag: साक्षीचा गुन्हा सर्वांसमोर उघड होणार? 'ठरलं तर मग' मालिकेचा नवा प्रोमो आऊट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com