Pakistan Election 2024: पाकिस्तानच्या निवडणुकीत इम्रान खान यांच्या बाजून जनतेचा कौल, पण खेळ बिघडवण्यासाठी लष्कराचा प्लान तयार

Pakistan Election Update: पाकिस्तानमध्ये नॅशनल अॅसेंब्ली आणि प्रांतीय निवडणुकांचे मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू आहे. मतमोजणी सुरू असतानाच ट्रेंडही समोर येऊ लागला आहे. या ट्रेंडमधून पाकिस्तानचे निकाल सर्वात धक्कादायक असतील असं दिसत आहे.
Pakistan Election 2024
Pakistan Election 2024Saam Digital
Published On

Pakistan Election

पाकिस्तानमध्ये नॅशनल अॅसेंब्ली आणि प्रांतीय निवडणुकांचे मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू आहे. मतमोजणी सुरू असतानाच ट्रेंडही समोर येऊ लागला आहे. जे ट्रेंडमधून पाकिस्तानचे निकाल सर्वात धक्कादायक असतील असं दिसत आहे. आतापर्यंत 34 जागांचे निकाल आले असून इम्रान खान यांच्या बाजून जनतेचा कौल जात असल्याचं चित्र आहे. इम्रान समर्थक 265 पैकी 154 जागांवर पुढे आहेत. पीटीआयने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांनी १९ जागा जिंकल्या आहेत. तर नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. पक्षाचे 8 उमेदवार विजयी झाले आहेत. बिलावल भुट्टो यांचा पक्ष पीपीपी सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. पीपीपीचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत.

इम्रानला इजा करण्यासाठी लष्कराची योजना तयार

यावेळी पाकिस्तानचा पंतप्रधान कोण होणार हा प्रश्न आहे. पीएमएल-एनचे नवाझ शरीफ यांच्या लंडनमध्ये दीर्घकाळ राहण्याच्या आशांना मोठा धक्का बसू शकतो. जर हेराफेरीचे सरकार स्थापन झाले तर त्यांना पंतप्रधान व्हायचं नाही, असं नवाज यांनी आधीच सांगितलं आहे. अशा परिस्थितीत त्यांचे भाऊ आणि माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे नशीब बदलू शकते का? पण या सगळ्या जरा बाजूला ठेवून तुरुंगात असलेले इम्रान खान बाजी पलटवू शकतात.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लष्कराचा मोठा प्लान

पण इम्रानला हानी पोहोचवण्याची योजना लष्करानेही तयार केल्याची बातमी आहे. इम्रान समर्थक नेत्यांनी बाजू बदलून विजयानंतर त्यांना नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ या पक्षात सामील करून घेण्याची लष्कराची योजना आहे. पाकिस्तानी लष्करही या कामासाठी अनेक इम्रान समर्थक उमेदवारांच्या संपर्कात आहे.

Pakistan Election 2024
Lok Sabha 2024 Survey: महाराष्ट्रात मोदींच्या विजयी रथाला लगाम? फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला बसणार फटका?

गृहयुद्धाचे संकट अधिक गडद

काल रात्री उशिरा आलेल्या निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये इम्रानला पाठिंबा देणारे अपक्ष उमेदवार 100 हून अधिक जागांवर आघाडीवर होते. यानंतर पाकिस्तानमधील निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करण्यास विलंब केला. पीटीआय कार्यकर्त्यांनी दावा केला की त्यांच्या पक्षाचे उमेदवार विजयी होत आहेत, त्यामुळे निकालाला उशीर होत आहे. पीटीआयकडून धमक्याही देण्यात आल्या आहेत. पक्षाने निवडणुकीत हेराफेरीचा आरोप केला आहे आणि पाकिस्तानची जनता हे मान्य करणार नाही' पाकिस्तानमध्ये जनादेशाची खुलेआम चोरी केली जात आहे. ही हेराफेरी आणि दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, असं म्हटलं आहे.

Pakistan Election 2024
Bharat Ratna Award: ब्रेकिंग! माजी पंतप्रधान नरसिंह राव, चौधरी चरणसिंह आणि एमएस स्वामीनाथन यांना 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com