पराग ढोबळे, नागपूर|ता. ११ जानेवारी २०२४
नागपूर जिल्हा बँक घोटाळा (Nagpur Bank Scam) प्रकरणात कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाने जामीन मंजूर होताच काल (बुधवार, १० जानेवारी) त्यांची जेलमधून सुटका झाली. सुनील केदार यांच्या सुटकेनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढत जल्लोष केला. या रॅलीप्रकरणी आता मंत्री सुनील केदार यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५० कोटींच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांची जेलमधून जामिनावर सुटका करण्यात आली. सुनील केदार यांच्या सुटकेवेळी त्यांच्या समर्थकांनी कोर्ट परिसरात मोठी गर्दी केली होती. तसेच ते बाहेर आल्यानंतर भव्य रॅली काढून त्यांचे स्वागत करण्यात आले.
सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या समर्थकांनी विना परवानगी रॅली काढल्याने सुनील केदार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्र कारागृहाबाहेर गर्दी करून विना परवानगी जल्लोष रॅली काढणे, वाहतुकीस अडथळा, यासह अन्य काही, धोकादायक पद्धतीने वाहन चालवण्यासह विविध बेकायदेशीर केल्यानं गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
सुनील केदार, यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर कुंभारे, विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष कुंदा राऊत, जिल्हा परिषदेच्या सभापती अवंतिका लेकुरवाळे, अनिल राय, संजय मेश्राम, विष्णु कोकड्डे यांच्यासह इतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा धंतोली पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.