Aamir Khan GF Gauri SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aamir Khan GF Gauri : "कहा से आते हो आप लोग..."; पाठलाग करणाऱ्या पापाराझींवर आमिर खानची गर्लफ्रेंड भडकली, पाहा VIDEO

Gauri Spratt Viral Video : आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी स्प्राटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ती पापाराझींवर भडकताना पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी स्प्राटचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

गौरी स्प्राट पापाराझींवर भडकली आहे.

गौरीच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. तो सध्या गर्लफ्रेंड गौरी स्प्राट (Gauri Spratt) सोबत राहत आहे. आमिर आणि गौरी अनेक वेळा एकत्र स्पॉट होतात. मात्र सध्या गौरी स्प्राटचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये गौरी चिडलेली पाहायला मिळत आहे.

गौरीला नुकतेच मुंबईत स्पॉट करण्यात आले. तिचे फोटो काढण्यासाठी पापाराझी तिच्या मागे फिरताना दिसले. ज्यामुळे गौरी खूपच वैतागली. पापाराझी आपले फोटो काढत आहे आणि आपला पाठलाग करत आहे हे पाहून गौरी अस्वस्थ आणि नाराज झाली. गौरी म्हणते की, "तुम्ही लोक कुठून आलात? तुम्ही माझा पाठलाग का करत आहात? मला एकटे सोडा..." अशा शब्दात तिने पापाराझींना चांगले सुनावले.

गौरी स्प्राटचा हा व्हिडीओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी या व्हिडीओवर खूप कमेंट्स करत आहे. या व्हिडीओवर समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक पापाराझींना नावे ठेवत आहे. तर काही लोक तिच्यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. गौरी स्प्राटचा हा व्हायरल व्हिडीओ मुंबई वांद्रे येथील आहे.

आमिर खान अलिकडेच आर्यन खानचा 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड'मध्ये पाहायला मिळाला. त्याआधी तो 'सितारे जमीन पर' आणि 'कुली' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. आमिर खान बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो.आमिर खान आज 60 व्या वाढदिवशी रिलेशनशिपची कबुली दिली. गौरी आमिर खानच्या प्रोडक्शन बॅनरखाली काम करते.'लाहौर 1947' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याच्या सोबत सनी देओल झळकला आहे. चाहते आमिरच्या आगामी चित्रपटांसाठी खूप उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakri Making Tips: भाकरी थापताना तुटते, फुगतच नाही? वापरा १ सोपी ट्रिक, भाकऱ्या होतील गोल अन् मऊ

'माझ्यासकट माझ्या कुटुंबियांचं नाव मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न', उद्धव ठाकरेंना संशय

Maharashtra Live News Update : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील घेणार डॉक्टर महिला कुटुंबीयांची भेट

Satyacha Morcha: सत्याच्या मोर्चामध्ये राज ठाकरेंनी दाखवला पुराव्याचा ढिगारा; विरोधकांचा आयोगावर हल्लाबोल, जाणून घ्या कोण काय म्हणाले?

Hair Oil : केस मुळापासून होतील स्ट्राँग, नियमित करा या तेलाचा वापर

SCROLL FOR NEXT