Manasvi Choudhary
पावभाजी खायला सर्वांनाच आवडते. घरच्याघरी देखील तुम्ही चविष्ट पावभाजी बनवू शकता.
पावभाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य कांदा, प्लॉवर, बटाटा, वाटाणे, शिमला मिरची, आलं- लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला, कोथिंबीर, मीठ, बीट, तूप, लिंबू, दही हे साहित्य एकत्र करा
पावभाजी बनवण्यासाठी सर्वात आधी बटाटे, फ्लॉवर, टॉमेटो, शिमला मिरची सर्वकाही कुकरमध्ये शिजवून घ्या.
त्यानंतर या भाज्या काढून त्या मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. हिरव्या वाटाण्यांसोबत कुकरला या भाज्या उकडून घ्या.
गॅसवर कढई ठेवा. त्यात तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, तिखट मसाला आणि पावभाजी मसाला टाका.
मिश्रणात आलं-लसणाची पेस्ट, लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला, मीठ, आमचूर पावडर , लिंबू आणि दही घालून सर्व मिक्स करून घ्या.
त्यानंतर सर्व मसाले मिक्स करुन घ्या. त्यात पाणी टाका. मसाल्यांना छान तेल सुटल्यावर त्यात सर्व भाज्या टाकून पाणी घालून छान उकळी येऊ द्या.
यानंतर तुम्ही भाजी थोडा वेळ शिजवून घ्या. यानंतर पावाला मस्त बटर लावून पावभाजी खा.