Gauri Kulkarni Got Engagement? Saam TV
मनोरंजन बातम्या

Gauri Deshmukh On Engagement: ‘आई कुठे काय करते’ फेम गौरी देशमुखचा खरंच साखरपुडा झाला का?, अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा

Gauri Deshmukh Post: टिव्ही अभिनेत्री गौरी कुलकर्णीच्या एका फोटोची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत होती. खुद्द अभिनेत्रीनेच त्या फोटोमागील गुपित चाहत्यांसमोर उघड केलं आहे.

Chetan Bodke

Gauri Kulkarni Clarification On Engagement

सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री गौरी देशमुख सध्या सोशल मीडियावर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये तिने आपल्या चाहत्यांसोबत एका अंगठीचा फोटो शेअर केला होता. फोटोची सोशल मीडियावर अवघ्या काही वेळातच तिने साखरपुडा केला की काय?, अशी चर्चा होत होती. नेमकं अभिनेत्रीने कोणासोबत साखरपुडा केला? याबद्दल सर्वांनाच प्रश्न होता. यावर नुकतंच अभिनेत्रीने एका व्हिडीओच्या माध्यमातून त्या पोस्टमागील गुपित उघड केलं आहे.

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचा २३ सप्टेंबरला वाढदिवस होता. तिने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केला होती. या शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने नेल आर्ट दाखवत तिच्या डाव्या बोटातली अंगठी सुद्धा दाखवली. अभिनेत्रीची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी तिचा साखरपुडा झाला, थेट असाच अंदाज बांधला होता. त्यावर गौरीने नुकतीच एका व्हिडीओच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. त्या फोटोमागील नेमका अर्थ काय हे तिने स्पष्ट केलं आहे. गौरीचा साखरपुडा झालेला नसून तो फोटो तिच्या नव्या बिजनेसची जाहिरात करण्यासाठी होता. गौरीने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्वतःचा नेल आर्टचा ब्रँड सुरू केला आहे.

अभिनेत्रीच्या या नव्या ब्रँडचं नाव ‘नखरेल नेल्स’ असं आहे. तिने तिच्या ब्रँडचा लोगो शेअर करत ब्रँडचे नाव देखील सांगितले. पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने सांगितले की, ‘होय मी एन्गेज आहे, एका खास गोष्टीसोबत. नुकतंच मी माझ्या नव्या ब्रँडसोबत एन्गेज झाली आहे. गौरी कुलकर्णीचा प्रेस ऑन नेल ब्रँड ‘नखरेल नेल्स’. मी माझ्या या बाळाची गेल्या अनेक दिवसांपासून प्लॅनिंग करत होते, आता अखेर तुमच्यासाठी तुमच्या समोर मी घेऊन आली आहे. या नवीन उपक्रमावर आणि क्रिएटिव्ह कलेक्शनवर तुम्ही सर्वजण प्रेमाचा वर्षाव कराल, जे पाहण्यासाठी मी तुम्हा सर्वांची वाट पाहू शकत नाही. तुम्ही मला ऐवढं प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद. खूप सारं प्रेम...’ मी जेव्हा खरंच साखरपुडा करेन तेव्हा तुम्हा सर्वांना नक्कीच सांगेन... असं देखील अभिनेत्री आपल्या पोस्टमध्ये म्हणाली आहे.

गौरी व्हिडीओमध्ये म्हणते, “तुम्ही माझ्या गेल्या पोस्टला जो भरभरुन प्रतिसाद दिला, प्रेम दिलं, तो प्रतिसाद माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त होता. त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. शेअर केलेल्या पोस्टबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला जितकी उत्सुकता आहे, तेवढीच उत्सुकता मला सांगण्यासाठीही आहे. जर तुमचं त्या पोस्टमध्ये लक्ष गेलं असेल तर, मी बऱ्यापैकी तुम्हाला माहिती दिली आहे. मी कोणामध्ये गुंतलेली नसून एका गोष्टीमध्ये मी गुंतलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून जे माझं स्वप्न आहे, ते आता माझं स्वप्न पुर्ण होत आहे. मी लवकरच माझा एक ब्रँड लाँच करतेय. त्या ब्रँडचं नाव आहे, ‘नखरेल नेल्स’. ‘नखरेल नेल्स’ हा ब्रँड प्रेस ऑन नेल्सचा ब्रँड आहे. मी तुमच्यासोबत माझ्या या ब्रँडविषयी सर्व माहिती शेअर करत आहे.”

त्यासोबतच अभिनेत्रीने मी आतापर्यंत तुमच्या समोर एक अभिनेत्री म्हणून समोर आली होती. आता तुमच्या समोर एक उद्योजिका म्हणून आली आहे. जसा अभिनेत्री म्हणून तुमचा प्रतिसाद लाभला, तसाच प्रतिसाद एक उद्योजिका म्हणून देखील तुम्ही द्याल अशी अपेक्षा करते. अभिनेत्रीच्या या नव्या पोस्टचं कौतुक फक्त तिच्या चाहत्यांनीच नाही तर सेलिब्रिटी मित्रांनीही केलं आहे. गौरीच्या या नव्या पोस्टवर युजर्सने लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेक सेलिब्रिटी मित्रांनी अभिनेत्रीला तिच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT