Milind Gawali Shared Shooting Experience: ‘लहान बाळ परमेश्वराचे रूप असतं...’ अनिरुद्धने शेअर केला नातीसोबतच्या शुटिंगचा अनुभव

Milind Gawali News: मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर अभिषेक आणि अनघाच्या मुलीचे पात्र साकारणाऱ्या ‘जानकी’साठी खास पोस्ट शेअर केली आहे.
Milind Gawali Shared Shooting Experience
Milind Gawali Shared Shooting ExperienceInstagram
Published On

Milind Gawali Shared Shooting Experience

‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळी कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अनिरुद्धच्या भूमिकेतून प्रकाशझोतात आलेल्या मिलिंद गवळींनी नुकतंच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. नुकतंच त्यांनी मालिकेत ‘जानकी’ नावाचे पात्र साकारणाऱ्या ‘त्विशा’बद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या सोबतच्या काही आठवणी त्यांनी पोस्टमध्ये शेअर केल्या आहेत.

थोडक्यात ‘जानकी’बद्दल सांगायचे तर, तिने मालिकेत अभिषेक आणि अनघाच्या मुलीचे पात्र साकारले आहे. या क्यूट ‘जानकी’चा अर्थात‘त्विशा’चा नुकताच मिलिंद गवळींनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी एक पोस्ट देखील चाहत्यांसोबत शेअर केली.

Milind Gawali Shared Shooting Experience
Salaar VS Dunki: ख्रिसमसमध्ये प्रभास अन् किंग खानची होणार टक्कर, कोण रचणार इतिहास?

मिलिंद गवळी पोस्टमध्ये म्हणतात, “ “त्विशा” म्हणजेच आमच्या “आई कुठे काय करते” या मालिकेतलं छोटसं पिल्लू “जानकी” अगदीच काही महिन्याची असताना ती आमच्या सिरीयलमध्ये आली, अगदी एखाद्या घरामध्ये लहान बाळ जन्माला येतं तसंच सगळ्यांना वाटतं आणि आपल्या घरामध्ये कसं लहान मुलाच्या खाण्यापिण्याच्या झोपायच्या वेळा सगळं सांभाळल्या जातात, तसंच त्विशाच्या बाबतीतही अगदी तसंच सगळं पाळलं जातं, मधेच एखादा असिस्टंट धावत यायचा की त्विशा आता उठली आहे, आता ती छान खेळते आहे, मग बाकीचे जे शूटिंग चालू असायचं ते थांबून तिच्या सिनच शूटिंग सुरू करायचं.”

शुटिंगचा अनुभव सांगताना मिलिंद गवळी सांगतात, “तिचीही सेटवरच्या सगळ्यांची ओळख झाली असल्यामुळे सगळ्यांकडे ती छान पद्धतीने रमते. महिन्यात न एखाद दोन दिवस तिथे शूटिंग असायचं, आणि त्यादिवशी सेटवर एक वेगळच चैतन्य पसराचं, बहुतेक सगळेच प्रौढ, लहान मुलासारखं बोलायला लागायचे, आणि ज्या सीन मध्ये ती असेल तो सीन कसा होईल हे कोणालाच ठाऊक नसायचं, कारण ती ज्या पद्धतीने ते करेल तिचा mood असेल त्या पद्धतीनेच ते शूटिंग व्हायचं, सिरीयल मध्ये माझ्या वाटेला तिचे सिन फार कमी आले आहेत, पण ज्या ज्या वेळेला ते आले त्या त्या वेळेला मला तो सीन करायला खूपच मजा आली, आपण शूटिंग करतो असं वाटायचं नाही लहान मुलाबरोबर लहान मुलासारखा आपण खेळतोय असंच वाटायचं.”

Milind Gawali Shared Shooting Experience
Yash Chopra's Birth Anniversary: 'इंग्लंडला जाण्यासाठी मुंबईत आले अन...' कशी झाली रोमान्स किंग यश चोप्रा यांच्या फिल्मी करियरची सुरुवात

पुढे मिलिंद गवळी सांगतात, “खरंतर अनिरुद्ध देशमुखला ह्या गोष्टींची फार गरज असते, पण काल त्विशा बरोबर माझा सीन होता, आणि हल्ली ती ज्या पद्धतीने धावते पळते एका जागेवर स्वस्त बसत नाही, अख्या सेटभर ती फिरत असते, कधी कधी तिला कडेवर घेऊन बसवावं लागतं, काल अचानक तिचे “आई कुठे काय करते” मधले सुरुवातीचे दिवस आठवले आणि लक्षात आलं की एक वर्ष निघून गेलं, आणि कसं ते कोणाला कळलच नाही. परवापर्यंत रांगत होती मग चालायला शिकली आणि आता चक्क धावते.... लहान बाळ परमेश्वराचे रूप असतं असं म्हणतात ते काय खोटं नाही, तिला उदंड आयुष्य यश आरोग्य आनंद सुख समृद्धी सर्व काही मिळो हीच त्या परमेश्वराकडे प्रार्थना...”

Milind Gawali Shared Shooting Experience
Marathi Board Decision: पुढील २ महिन्यांत दुकानावर मराठी पाट्या लावा; सुप्रीम कोर्टाचा आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com