सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांची धमाकेदार कमाई सुरु आहे. बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात दोन तगड्या स्टारकास्टचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
बॉलिवूडच्या किंग खानचा ‘डंकी’ तर प्रभासचा ‘सालार’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सेलिब्रिटींचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये काटे की टक्कर होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी ‘ख्रिसमस’च्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. किंग खानचा ‘डंकी’ आणि प्रभासचा ‘सालार’ या वर्ष अखेरीस ख्रिसमसच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभासच्या चित्रपटाची आणि किंग खानच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभासचा ‘सालार’ ही २२ डिसेंबरलाच प्रदर्शित होणार आहे. ‘सालार’चे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या पत्नीने इन्स्टास्टोरी शेअर केली होती. त्यामध्ये त्यांनी सांगितले, ‘डिसेंबर २०२३ हा प्रेक्षकांसाठी फारच खास असेल.’
शाहरुखप्रमाणे प्रभासचाही चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर, परदेशातही पाहायला मिळतो. शाहरुख सध्या ‘जवान’ मुळे तुफान चर्चेत असून त्याचे या वर्षी एकूण तीन चित्रपट चाहत्यांचे जबरदस्त मनोरंजन करणार आहे.
जानेवरीमध्ये ‘पठान’, सप्टेंबरमध्ये ‘जवान’ने तर, येत्या डिसेंबरमध्ये ‘डंकी’च्या माध्यमातून शाहरुख चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. तर प्रभास ‘आदिपुरुष’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण त्या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्याने चाहत्यांचे खास लक्ष वेधले. पण आता प्रभास ‘सालार’ मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला शाहरुखसोबत तापसी पन्नु सुद्धा येणार आहे. बिगबजेट म्हणून या चित्रपटाकडे प्रेक्षक सध्या पाहत आहेत. तर प्रशांत नील दिग्दर्शित ‘सालार’मधून प्रभाससोबत चित्रपटामध्ये श्रुती हसन, पृथ्वीराज सुकुमारण देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.