
बॉलिवूडचा 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरीना कैफ यांचा बहुप्रतिक्षित 'टायगर 3' मुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. आता या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरच्या माध्यमातून टायगरने खास मेसेज दिला आहे. या टीझरला अवध्या काही मिनिटांमध्येच प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली आहे.
'टायगर ३' या चित्रपटाच्या टीझरची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर सलमान खानच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. टायगर ३ चा दमाकेदार टीझर आज रिलीज करण्यात आला आहे. टायगर ३ च्या माध्यमातून सलमान खान आणि कतरीना कैफ यांना पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना पाहून चाहते खुश झाले आहेत. यापूर्वी ही जोडी टायगर फ्रेंचाइडीच्या प्रीक्वलमध्ये देखील दिसली होती.
'टायगर 3'चा टीझर रिलीज होण्यापूर्वी सलमान खानने मंगळवारी रात्री त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर 'टायगर 3'चा फोटो पोस्ट केला होता. फोटोमध्ये फक्त सलमान खानचे डोळे दिसत असून त्यावर टायगरचा मेसेज उद्या बाहेर येईल असे लिहिले होते. फोटो पोस्ट करताना सलमान खानने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'मी मेसेज आहे...उद्या देतो, टायगरचा मेसेज उद्या सकाळी ११ वाजता.' सलमान खानने अखेर ११ वाजता टायगर ३ चा टीझर रिलीज करत टायगरचा तो मेसेज दिलाआहे.
'टायगर ३' चा टीझर पाहून हा चित्रपट किती दमदार असेल याचा अंदाज येत आहे. या चित्रपटाचा जबरदस्त टीझर पाहून सलमानचे चाहते चित्रपट कधी रिलीज होणार याची वाट पाहू लागले आहे. 'टायगर 3' चित्रपट दिवाळीमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान, कतरीना कैफ व्यतिरिक्त इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. इमरान या चित्रपटात विलनची भूमिका साकारणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.