Milind Gawali Post Raksha Bandhan Sister Relation Instagram
मनोरंजन बातम्या

Milind Gawali Post: मिलिंद गवळींनी बहिणीसोबत सेलिब्रेट केलं रक्षाबंधन, स्पेशल पोस्ट करत सांगितलं बहीण- भावाच्या नात्याचं महत्व...

Milind Gawali Celebrate The Raksha Bandhan: ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी ‘रक्षाबंधन’निमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

Milind Gawali Post Raksha Bandhan Sister Relation

‘आई कुठे काय करते’ मालिकेमध्ये मिलिंद गवळी यांनी अनिरुद्धचे पात्र साकारले आहे. कायमच मिलिंद गवळी सोशल मीडियावर सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर ‘रक्षाबंधन’निमित्त एक विशेष पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केली आहे. या शेअर केलेल्या पोस्टमध्ये आपल्या बहिणीचा विशेष उल्लेख करत ती पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “रक्षाबंधन / राखी पौर्णिमा, लहानपणापासून हा सण फारच मोठा सण म्हणून आमच्या घरात मानला जायचा साजरा केला जा, माझी आई दादरच्या मार्केटमधून खूप दिवस आधीच राख्या घेऊन आलेली असायची, अगदी छान डिझाईनच्या राख्या, त्या पण एक-दोन नाही आठ दहा घेऊन यायची. माझी धाकटी बहीण संगीता छान तयारी करून मग मला ओवाळायची, नवीन शर्ट-टी-शर्ट मिळायचे, मग मस्तपैकी बर्फी पेढा किंवा लाडू भरवायची, आणि त्या काळामध्ये माझं आणि साखरेचे काही वैर नव्हतं त्यामुळे मी मनसोक्त त्याचा आस्वाद घ्यायचो, कालांतराने माझ्यात आणि साखरेमध्ये वैर निर्माण झालं... ”

आपल्या पोस्टमध्ये मिलिंद गवळी पुढे म्हणतात, “पण माझं आणि माझ्या बहिणीचं नातं अगदी घट्ट घट्ट होत गेलं, आई गेल्यानंतर , संग्या ने आईची जागा घ्यायचा प्रयत्न केला, आजही ती आईचीच जागा घेते आहे, रक्षाबंधन म्हणजे भावांनी बहिणीची रक्षा करायचं वचन तो बहिणीला देत असतो, पण आजपर्यंत माझ्याच बहिणीने माझी रक्षा केली आहे.”

“माझ्या आईची अगदी जीवश्य कंठश्य मैत्रीण जिला मी शानबाग मावशी असं म्हणायचो, दरवर्षी शानबाग मावशी माझ्या पप्पांना राखी बांधायच्या, आणि त्यांच्या दोन मुली सुमेधा आणि सुचित्रा प्रेमाने आम्ही त्यांना राणी पिंकी म्हणतो, त्या दोघी मला राखी बांधायच्या, आज शानबाग मावशी नाहीत आणि माझी आई नाही तरीही राखी पौर्णिमेची परंपरा चालू आहे.”

आपल्या पोस्टमध्ये मिलिंद गवळी पुढे म्हणतात, “आजकालच्या धकाधकीच्या जीवनात , प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी कामात, व्यवसायात गुंतलेला आहे, वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये प्रत्येकाला राहावं लागत आहे,अशा सणांच्या दिवशी कितीही इच्छा असली तरी एकत्र येणं होत नाही. पण अशा दिवशी बहिणीला भावाची आणि भावाला बहिणींची खूप खूप आठवण येतच असते.माझ्या या सिनेमा क्षेत्रामध्ये सुद्धा माझ्या असंख्य बहिणी आहेत, त्यात अलकाताई म्हणजे हक्काची माझी मोठी बहीण, सुप्रिया, सीमा, पूनम त्या तर मला मिलिंद दादाच म्हणतात, मला मामे बहिणी आहेत.”

आपल्या पोस्टच्या शेवटच्या मिलिंद गवळी म्हणतात, “मीनल मंजुषा माधुरी, शिल्पा आणि स्मिता, आणि शक्ती मग माझ्या मावस बहिणी आहेत. प्रीतम,सृष्टी, विद्या ,ज्योती, सोनल ,शितल, गुड्डी, माझ्या चुलत बहिणी आहेत वर्षा,वैशाली, स्वाती आणि वृषाली मला फक्त आते बहीण नाहीये कारण माझ्या आत्याला तीन मुलं च आहेत. आज रक्षाबंधनाच्या दिवशी मी माझ्या बहिणींना मिस करतोय, त्यांना मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो, सुख समृद्धी यश आरोग्य त्यांना, आणि त्यांच्या कुटुंबीयांना भरभरून मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raw Banana Fry Recipe: भूक लागलीये? फक्त १० मिनिटांत तयार करा चवदार कच्ची केळी फ्राय

Anshula Kapoor Engaged: कपूर कुटुंबात लवकरच सनई चौघडे वाजणार! अंशुला कपूरच ठरलं; बॉयफ्रेंडनं 'या' ठिकाणी केलं प्रपोज

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Rain Alert : राज्यभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा | VIDEO

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी, २५०० पदांसाठी भरती, पगार ८५००० रुपये; आजच अर्ज करा

SCROLL FOR NEXT