Thalapathy Vijay At Airport: स्वतःच्या चित्रपटापेक्षा 'जवान' महत्त्वाचा... अमेरिकेतून थलापती विजय 'जवान'साठी चेन्नईत दाखल?

Thalapathy Vijay Cameo In Jawan: साऊथचा सुपरस्टार थलापती विजय 'जवान' चित्रपटामध्ये दिसणार असल्याच्या चर्चा आहेत.
Thalapathy Vijay For Jawan Audio Launch
Thalapathy Vijay For Jawan Audio LaunchSaam TV

Thalapathy Vijay Landed In India For Jawan:

साऊथचा सुपरस्टार थलापती विजय 'जवान' चित्रपटामध्ये दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. विजय या चित्रपटामध्ये कॅमिओ करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आता या चर्चांना पूर्णविराम मिळणार असे दिसत आहे. आज 'जवान'चा म्युजिक लाँच सोहळा पार पडणार आहे. आणि सोहळ्याला थलापती विजय देखील उपस्थित राहणार आहे.

Thalapathy Vijay For Jawan Audio Launch
Allu Arjun Share Video: आलिशान घरासह अल्लू अर्जुनने दाखवली 'Pusha 2: The Rule'च्या सेटची झलक

थलापती विजय 'लिओ' या चित्रपटानंतर त्याच्या आगामी चित्रपटाची तयारी करत आहे. व्यंकट प्रभू दिग्दर्शित 'थलापती ६८'मध्ये थलापती विजय दिसणार आहे. या चित्रपटाच्या काही कामानिमित्त नुकताच विजय लॉस एंजेलिसला गेला होता.

परंतु काही तासात तो पुन्हा भारतात यायला निघाला असल्याचे त्याच्या फॅनपेजवरून पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दिसत आहे. विजय चेन्नईला येत असल्याचे चर्चा सुरू झाल्या आहेत.

ईटाईम्सने दिलेल्या बातमीनुसार शाहरुख खानच्या जवान चित्रपटाच्या ऑडिओ लॉंचसाठी विजय प्रमुख पाहुणा म्हणून हजर राहणार आहे. आज म्हणजे ३० ऑगस्टला संध्याकाळी हा कार्यक्रम चेन्नई येथे पार पडणार आहे.

जवान चित्रपटातून दाक्षिणात्या दिग्दर्शक अॅटली बॉलिवूडमध्या पदार्पण करणार आहेत. अॅटली विजयचे फॅन असल्याने त्यांनी जवानमध्ये विजचा कॅमिओ प्लॅन केला आहे. जवान अॅटलीसाठी महत्त्वाचा असल्याने अनेक दाक्षिणात्या स्टार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

ऑडिओ लॉंच झाल्यानंतर जवानची टीम उद्या दुबईला रवाना होणार आहे. दुबईमधील जगप्रसिद्ध ठिकाण 'बुर्ज खलिफा' येथे जवान चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. ७ सप्टेंबरला जवान चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये पाहता येणार आहे. (Latest Entertainment News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com