Madhurani Prabhulkar Shared Post Instagram / @madhurani.prabhulkar
मनोरंजन बातम्या

Madhurani Prabhulkar Post: ".... आणि मला त्रास होत होता"; गाण्याच्या शुटिंगदरम्यान मधुराणी प्रभुलकरसोबत काय घडलं?

Aai Kuthe Kay Karte Serial Update: ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने नुकतंच सोशल मीडियावर शुटिंग दरम्यानचा एक अनुभव शेअर केला आहे.

Chetan Bodke

Madhurani Prabhulkar Shared Post

कायमच टीआरपी चार्टमध्ये अव्वल ठरलेली ‘आई कुठे काय करते’ मालिकेची कायमच प्रेक्षकांमध्ये चर्चा पाहायला मिळते. टीआरपीच्या यादीमध्ये नेहमीच टॉप ५ मध्ये राहणाऱ्या या मालिकेमध्ये आजवर अनेक ट्वीस्ट प्रेक्षकांनी अनुभवले आहेत. पण ही मालिका नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

‘आई कुठे काय करते’मधील अरुंधती, अनिरुद्धसह अनेक स्टारकास्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून शुटींगचे अनुभव शेअर करत असतात. अशातच ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने सोशल मीडियावर एक शुटिंग दरम्यानचा एक अनुभव शेअर केला आहे.

मधुराणी एक उत्तम अभिनेत्री असून ती एक गायिका आणि कवियित्री सुद्धा आहे. अनेकदा मधुराणी मालिकेमध्येही तिला गाताना पाहिलं आहे. नुकतंच तिने पोस्टच्या माध्यमातून शुटिंग म्हणजे रोजची परिक्षा असते, असे म्हणत शुटिंग दरम्यानचा एक किस्सा शेअर केला आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये मधुराणी म्हणते, “डेली सोप म्हणजे जवळपास रोजच शूटिंग. आणि त्यात एखादा दिवस म्हणजे परीक्षा असते. मला ह्या गाण्याचं शूट करायचं होतं, त्यादिवशी प्रचंड मायग्रेनचा त्रास होत होता. पण काम करणं प्राप्त होतं. सेटवर गेल्यावर मला 'ही' अंगाई गायची आहे हे समजलं. सलीलच्या चाली गायला अवघड असतात.” (Tv Serial)

पुढे आपल्या पोस्टमध्ये मधुराणी सांगते, “ती बसवायची आणि लाईव्ह गायची इतकं डोकं ठणठणत असताना.. म्हणजे मला अजूनच टेन्शन आलं. पण संदीपच्या शब्दात आणि सलीलच्या चालीत जादू असते. जसं मी गाणं गुणगुणायला लागले तसं मला शांत वाटायला लागलं आणि गाण्यात त्या बाळाला मी थोपटत आहे खरी पण मनात मी स्वतःला जणू जोजवत होते. संगीताची जादू ती हीच... तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा...” (Social Media)

मालिकेचा प्रेक्षकवर्ग प्रचंड मोठा आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेमध्ये अरुंधती, अनिरुद्ध, संजना, अनघा, यश अशा वेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांचे मन जिंकले. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT