Madhurani Prabhulkar Video: ‘रोज नवीन काहीतरी शिकत असतो आपण...’, ‘आई कुठे काय करते’मधील अरुंधतीने स्वीकारलं मोठं चॅलेंज

Aai Kuthe Kai Karte Madhurani Prabhulkar News: अभिनेत्रीने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शूटिंगचा किस्सा शेअर केला आहे.
Madhurani Prabhulkar Shared The Experience During The Shooting
Madhurani Prabhulkar Shared The Experience During The ShootingInstagram

Madhurani Prabhulkar Shared The Experience During The Shooting

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. मालिकेतून प्रचंड प्रकाशझोतात आलेल्या मधुराणीच्या सोशल मीडिया पोस्टची सध्या तुफान चर्चा सुरू आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने चाहत्यांसोबत एक शूटिंगचा किस्सा शेअर केला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री ड्रायव्हिंग करताना दिसत असून तिची ही पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे.

Madhurani Prabhulkar Shared The Experience During The Shooting
Spruha Joshi Post: 'भावा लय मोठा झालास...' स्पृहा जोशीने शेअर केले मॉनिटरसोबतचे गोड फोटो

अभिनेत्री पोस्टमध्ये म्हणते, “रोज नवीन काहीतरी शिकत असतो आपण...! गाडी चालवायला आवडतेच मला. पण तशी उशीरा शिकले गाडी चालवायला. अलिकडेच म्हणायला हवं. गाडी येणं ह्याचे अनेक फायदे वेळोवेळी अनुभवले. पण अशी कधी गाडी चालवू असा विचारही केला नव्हता.” (Actress)

Madhurani Prabhulkar Shared The Experience During The Shooting
Jawan Collection Day 10: 'किंग खान'चा 'जवान' सुसाट, जगभरात ७०० कोटींपार कमाई; बाहुबलीचा रेकॉर्ड ब्रेक करणार का?

अभिनेत्री आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणते, “रिग, कॅमेरा आणि घाटातला प्रवास... त्यात घाटात गाडी सांभाळायची, संवाद म्हणायचे, इमोशन्स सांभाळायच्या, रस्त्यावरचं लक्ष ढळू द्यायचं नाही... ही तारेवरची कसरत होती. सुरुवातीला जरा भीती वाटली पण नंतर मजा यायला लागली. भीती ची भावना पार केली तरच अनुभव गाठीशी गोळा होतात. नाहीतर आपण तिथेच राहतो, नाही का !” (Serial)

मालिकेबद्दल सांगायचे तर, दिवसेंदिवस मालिकेमध्ये नवनवे ट्वीस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत निरंजन कुलकर्णी, अभिषेक देशमुख, अश्विनी महांगडे, मिलिंद गवळी, अपूर्वा गोरे, मिलिंद गवळी यांनी साकरली आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com