Spruha Joshi Post: 'भावा लय मोठा झालास...' स्पृहा जोशीने शेअर केले मॉनिटरसोबतचे गोड फोटो

Harshad Naybal: हर्षदने त्याच्या गाण्याने सगळ्यांची मने जिंकली होती.
Spruha Joshi Post Photo With Harshad Naybal
Spruha Joshi Post Photo With Harshad NaybalSaam TV
Published On

Spruha Joshi With Harshad Naybal:

'सूर नाव ध्यास नवा'मधील हर्षद नायबळ तुम्हाला आठवतो का? या छोट्या मॉनिटरने संपूर्ण पर्वात धुमाकूळ घातला होता. त्याच्या मस्तीने, निरागस प्रश्नांनी सगळ्यांना भांडावून सोडले होते. पण हर्षदने त्याच्या गाण्याने सगळ्यांची मने जिंकली होती. चार - साडेचार वर्षांच्या या मुलाने सगळ्यांच्या मनात घर केलं होतं.

Spruha Joshi Post Photo With Harshad Naybal
Parineeti Chopra Video: बस्स झालं आता, तुम्ही का आलात? पापाराझींना पाहताच संतापली परिणीती चोप्रा; VIDEO व्हायरल

हर्षद नायबळ यांनी स्पृहा जोशी यांची या शोमधील केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. त्यांच्या एक चांगला बॉण्ड देखील झालं होतो. 'सूर नवा ध्यास नवा- छोटे उस्ताद'च्या मंचावर आपण स्पृहा आणि हर्षद यांचा बॉण्ड पाहिला आहे. (Celebrity)

हर्षद नायबळला अनेक दिग्गजांनीही या कार्यक्रमात चित्रपटांची ऑफर दिली होती. हर्षद पिंकाचा विजय असो या मालिकेत दिसला होता. आता छोटा हर्षद मोठा झाला आहे. स्पृहा आणि हर्षदची पुन्हा भेट झाली आहे. स्पृहाने तिच्या इंस्टाग्राम दोघांचे फोटो शेअर केले आहेत.

स्पृहा जोशी एका कार्यक्रमानिमित्त छत्रपती संभाजी नगर येथे गेली होती. हर्षद नायबळ मूळचा छत्रपती संभाजी नगरचा रहिवासी आहे. त्याच्या शहरात गेल्यानंतर स्पृहा आणि हर्षद भेटले.

स्पृहा जोशीने त्यांचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देत स्पृहाने लिहिले आहे की, 'तू खूप मोठा झाला आहेस! काही नाती कधीच बदलत नाहीत' तर हर्षदने देखील ते फोटो त्याच्या इंस्टा स्टोरीला शेअर केले आहेत. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com