परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाह सोहळा २३-२४ सप्टेंबरला पार पडणार आहे. राजस्थानला होणाऱ्या या विवाह सोहळ्या अनेक दिग्ग्ज उपस्थित राहणार आहेत. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास देखील या परिणीती - राघवच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. परिणितीच्या तिच्या लग्नचा तयारी करता करता तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन देखील करत आहे.
दरम्यान परिणितीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती पापाराझींवर भडकलेली आहे. तसेच परिणीती त्यांना म्हणते 'मी तुम्हाला नाही बोलावलं'.
परिणीती तिच्या लागणीच्या तयारीत आहे. परिणीती आणि राघव त्यांच्या लग्नविषयीच्या गोष्टी खूप खासगी पद्धतीने करत आहेत. त्यामुळे त्यांना पापाराझींनी त्यांच्या प्रत्येक गोष्ट व्हायरल करावी असे वाटत नाही. शुक्रवारी परिणीती पापाराझींच्या कॅमेरात स्पॉट झाली. गाडीतून उतरताच पापाराझींनी तिला घेरलं. त्यांना पाहताच परिणीती भडकली. तसेच त्यांना रागात म्हणाली, 'मी तुम्हाला बोलावलं नाही तरी तुम्ही इथे का आलात?'
रागातच परिणीती आतमध्ये गेली आणि पुन्हा बाहेर येत म्हणाली, 'सर बस करा, मी तुमचा आदर करते' असे बोलून परिणितीने पापाराझींसमोर हात जोडले. पापाराझीं देखील तिला सॉरी म्हणाले. हा व्हिडीओ देखील त्यांच्या पेजवरून डिलीट केला आहे.
परिणीती चोप्रा आणि अक्षय कुमार यांचा 'मिशन रानीगंज' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पहिले गाणे काळ प्रदर्शित झाले आहे.
तर दुसरीकडे परिणीती चोप्रा तिच्या लागणीच्या तयारीत बिझी आहे. त्यांच्ये लग्न राजस्थानला होणार असून चंदीगडला देखील रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. अनेक राजकीय नेते परिणीती आणि राघवच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. (Latest Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.