Milind Gavali Special Post For Omkar Govardhan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karate: अचानक एक दिवस...,'आई कुठे काय करते'च्या आशुतोषच्या निधनानंतर अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

Milind Gavali Special Post For Omkar Govardhan: या मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी नवा ट्विस्ट आला. अरुंधतीचा दुसरा नवरा अर्थात आशुतोषचा मृत्यू होतो. आशुतोषच्या निधनामुळे अरुंधती पुन्हा एकटी पडते. आता आशुतोषचा मृत्यू झाल्यामुळे केळकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो.

Priya More

Aai Kuthe Kay Karate Serial:

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karate) ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. ही मालिका टीआरपीच्या लिस्टमध्ये नेहमी पहिला क्रमांक पटकावते. मालिकेमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या मालिकेतील संवाद, प्रेम, भावनिक क्षण, कौटुंबिक नाते, देशमुख आणि केळकर परिवारामध्ये सतत घडणाऱ्या नवनवीन घडामोडी यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता या मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी नवा ट्विस्ट आला. अरुंधतीचा दुसरा नवरा अर्थात आशुतोषचा मृत्यू होतो. आशुतोषच्या निधनामुळे अरुंधती पुन्हा एकटी पडते. आता आशुतोषचा मृत्यू झाल्यामुळे केळकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो.

आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आशुतोष केळकरची भूमिका अभिनेता ओमकार गोवर्धनने (Omkar Govardhan) साकारली आहे. या मालिकेमध्ये आल्यापासून त्याने मालिकेतील प्रत्येक कलाकारांसोबत प्रेक्षकांचे देखील मन जिंकले. आता आशुतोषच्या जाण्याने फक्त प्रेक्षक नाही तर या मालिकेमध्ये काम करणारे कलाकर देखील नाराज झाले आहेत. आशुषोचा मृत्यू होतो म्हणजे या मालिकेतून ओमकार गोवर्धनची एक्झिट झाली आहे. अरुंधतीचा पहिला नवरा अनिरुद्ध देशमुख म्हणजेच अभिनेता मिलिंद गवळीने (Milind Gavali) ओमकार गोवर्धनसाठी खास पोस्ट लिहिली आहे. सध्या त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

मिलिंद गवळीने ओमकार गोवर्धनसोबतचे मालिकेच्या सेटवरील दोन फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, 'ओमकार गोवर्धन. याने आशुतोष केळकर या भूमिकेची कात टाकली! तीन साडेतीन वर्षांपूर्वी 'आई कुठे काय करते' या मालिकेमध्ये अरुंधती दुसरं लग्न करणार तिच्या आयुष्यामध्ये एक नवीन कॅरेक्टर इंट्रोड्युस होणार याची उत्सुकता होती. अचानक एक दिवस ओंकार गोवर्धन आणि माझी गाठ आमच्या आई कुठे काय करतेच्या सेटवर जिन्यामध्ये झाली.'

ओमकारची भेट की झाली याबद्दल मिलिंदने सांगितले की, 'मी ओमकारला पाहिल्या पाहिल्या म्हटलं अरे आपण तर आधी भेटलो आहोत. गजेंद्र अहिरे यांनी मला एकदा त्याच्या सिनेमाच्या ट्रायल शोसाठी बोलावलं होतं तो सिनेमा होता 'निळकंठ मास्तर' त्या निळकंठ मास्तरच्या भूमिकेमध्ये ओमकार गोवर्धन होता आणि मला त्याचं काम अतिशय आवडलं होतं. तोच मुलगा आता माझ्यासमोर आशुतोष केळकरच्या भूमिकेसाठी आई कुठे काय करतेमध्ये आला होता. मला त्याला बघून आनंद झाला. कारण माझा नमितावर खूप विश्वास आहे. तिचं कास्टिंग कधी चुकत नाही. मी ओमकारला शुभेच्छा दिल्या आणि त्याला म्हटलं 'वा मजा येणार आता, मला खात्री आहे तू छानच काम करशील!'

आणि अगदी तसंच झालं ओमकारने इतक्या प्रामाणिकपणे, इतक्या छान पद्धतीने आशुतोष केळकर ही भूमिका निभावली की तो सगळ्यांचा लाडका झाला! मी आणि आप्पा ज्या मेकअप रूममध्ये होतो त्याच मेकअप रूममध्येच ओमकारची सोय करण्यात आली आणि ओमकार आल्या दिवसापासून त्या मेकअप रूममध्ये फक्त कला मस्ती आणि हास्य रसाचा वर्षाव झाला. विनोद काय असतं हे ओमकारकडून शिकावं , सतत प्रसन्न राहणे, हसत राहणे आणि समोरच्याला हसवत राहणे हा त्याचा हातखंडा, पण एकदा का स्क्रिप्ट हातात आली की ती पाठ करायची, त्याच्यावर म्हणून चिंतन करत राहायचं, डोक्यात जितके प्रश्न येतात ते डायरेक्टरला विचारून त्याचा निरसन करायचं.'

'एखाद्याचं वाक्य चुकलं, शब्द चुकला किंवा त्याचा अर्थ बदलला, तर प्रथम त्याला ते लक्षात यायचं, पाठांतराच्या बाबतीत त्याचा हात कोणीच धरू शकत नव्हतं, त्याची तर असंख्य सिनेमांची गाणीसुद्धा तोंड पाठ असायची, कधी कधी मेकअप रूममध्ये आप्पा, अनीश आणि त्याच्यात्या गाण्यांच्या मैफिली व्हायच्या बरेचदा मी पण त्यात सामील व्हायचो, आता आशुतोष केळकर मालिकेत नसणार याचा मला स्वतःलाच खूप मोठा धक्का बसला आहे. मला माहितीये मी त्याला खूप खूप मिस करणार!'

' जसा लहानाचे एकत्र मोठे झालेले दोन भाऊ अचानक एक अमेरिकेला शिफ्ट व्हायला निघाला की त्या दुसऱ्या भावाची जी अवस्था होत असेल, तसंच काहीस फिलिंग आहे. पण त्याचं भाषेवरचं प्रभुत्व, त्याची अभिनयाची जाण, आणि त्याचं प्रोफेशनालिझम, त्याला आयुष्यामध्ये अजून खूप मोठं करणार अशी माझी खात्री आहे! ओंकारला माझ्या खूप खूप शुभेच्छा', असं मिलिंद गवळीने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT