मराठी सिनेसृष्टीसोबत बॉलिवूडमध्ये (Bollywood) नवनवीन आणि जबरदस्त भूमिका साकारुन आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री अमृता खानविलकरच्या (Amruta Khanvilkar) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजच्या माध्यमातून अमृता खानविलकर आपल्या भेटीला आली आहे. अमृता खानविलकर लवकरच आता नव्या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच अमृता 'लुटेरे' या नव्या कोऱ्या हिंदी वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमृता पुन्हा बॉलिवूडमध्ये झळकणार असल्यामुळे तिचे चाहते आनंदी झाले आहेत.
डिस्ने+ हॉटस्टारच्या 'लुटेरे' वेबसीरिज जय मेहता यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आली आहे. या वेबसीरिजचा ट्रेलर 6 मार्च रोजी रिलीज करण्यात आला होता. ट्रेलरपासूनच ही वेबसीरिज चर्चेत आली असून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 22 मार्च 2024 पासून या वेबसीरिजचे स्ट्रिमिंग सुरू होणार आहे. 'लुटेरे'मध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. अमृतासोबत रजत कपूर, विवेक गोंबर आणि आमिर अली हे देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत.
अमृताने आजवर बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आता ती पुन्हा एकदा नव्या बॉलिवूड प्रोजेक्टसाठी सज्ज झाली आहे. हा नवा प्रोजेक्ट तिच्यासाठी खूपच खास आहे. अमृता खानविलकर 'लुटेरे'मध्ये अनेक दिग्गज बॉलिवूडमधील कलाकारांच्या सोबतीने दिसणार आहे. 'स्कॅम 1992' आणि 'स्कूप' सारख्या सुपरहीट वेबसीरिज देणाऱ्या हंसल मेहता यांची 'लुटेरे' ही वेबसीरिज आहे.
लुटेरे वेबसीरिजबद्दल अमृता खानविलकरने सांगितले की, 'खूप दिवसांनी एक क्राईम थ्रिलर वेब सीरिजमध्ये काम करताना खूप आनंद होतोय. सोबतीने हंसलसर आणि जय मेहता यांच्या सोबतीने काम करण्यची अनोखी संधी मिळाली आहे. 2024 वर्षातला माझा हा पहिला हिंदी प्रोजेक्ट असून एवढ्या कमालीच्या कलाकारांसोबत काम करण्याचा योगायोग सुद्धा जुळून आला.' दरम्यान, 'लुटेरे' वेबसीरिजसोबत अमृता खानविलकर 'कलावती', 'पठ्ठे बापूराव', 'ललिता बाबर' यासारख्या मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.