Marathi Serial Off Air  AI PHOTO
मनोरंजन बातम्या

We Are Signing Off! लोकप्रिय मराठी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, २ वर्षांचा प्रवास थांबणार

Marathi Serial Off Air : स्टार प्रवाह वाहिनीवरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेच्या मुख्य अभिनेत्रीने त्यासंबंधित माहिती दिली आहे.

Shreya Maskar

मराठी मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप

शेवटच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण

मालिकेच्या सेटवर जंगी सेलिब्रेशन झाले

स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या नवीन मालिकांची क्रेझ पाहायला मिळत आहेत. अशात जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेनंतर आता आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग झाले असून कलाकारांनी यासंबंधित खास पोस्ट देखील शेअर केली आहे.

आदेश बांदेकरांची सून आणि मराठी अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिकेत असलेली मालिका 'येड लागलं प्रेमाचं' लवकरच संपणार आहे. या मालिकेतून राया-मंजिरीची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत पूजा बिरारीसोबत 'बिग बॉस मराठी 3' चा विजेता आणि मराठी अभिनेता विशाल निकम एकत्र झळकला. 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका २०२४ मध्ये सुरू झाली होती. आता दोन वर्षांनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ज्यामुळे चाहते आणि कलाकार खूपच भावुक झाले आहेत.

Pooja Birari

अभिनेत्री पूजा बिरारी हिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी री-पोस्ट केली आहे. ज्यात कलाकार शेवटच्या दिवशी केक कापून सेलिब्रेशन करताना दिसत आहे. स्टोरीवर लिहिलं आहे की, "We Are Signing Off!" 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री ११ वाजता प्रसारित होत असे. पूजा बिरारी, विशाल निकम यांच्यासोबतच मालिकेत नीना कुलकर्णी, अतिशा नाईक, शंतनू मोघे आणि वैभव चव्हाण यांसारखे कलाकार देखील झळकले आहेत.

'हळद रुसली कुंकू हसलं' मालिका संपली

अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर मुख्य भूमिकेत असलेली 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिका शनिवार ८ ऑगस्टला संपली. दुपारी १.०० वाजता मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. कृष्णा आणि दृष्यंतच्या जोडीला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. १० ऑगस्टपासून ऐश्वर्या नारकर यांची नवीन मालिका 'आमच्या लाडक्या नाईक बाई' सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेसाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oxidized Jhumka Designs : गरबा नाइटसाठी परफेक्ट! ऑक्सिडाइज्ड झुमक्यांचे ७ लेटेस्ट डिझाइन्स, घागरा-चोळीवर दिसतील खुलून

Maharashtra News Live Update: एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती रुपये द्यावे लागणार; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

अभिनेता आमिर खानच्या भाच्याला मोठा झटका! आंदोलनात सहभागी होणे पडले महागात; मुंबई पोलिसांनी दिली देश सोडण्याची नोटीस

Fennel Seeds Milk Benefits For Back Pain: दुधात बडीशेप मिसळून पिण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे, कंबरदुखी आणि थकवा होईल झटपट दूर

SCROLL FOR NEXT