Dharmendra health update Saam tv
मनोरंजन बातम्या

Dharmendra Health Update: ८९ वर्षीय धर्मेंद्र यांची प्रकृती कशी आहे? ८ दिवसांनी आली हेल्थ अपडेट

Dharmendra Health Update: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आठ दिवसांनी, अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे.

Shruti Vilas Kadam

Dharmendra Health Update: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र १२ नोव्हेंबर रोजी मृत्यूशी झुंज देऊन रुग्णालयातून घरी परतले. आजारपणामुळे दीर्घकाळ रुग्णालयात राहिल्यानंतर, धर्म पाजींच्या प्रकृतीबद्दल एक नवीन अपडेट समोर येत आहे, यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

जवळजवळ आठ दिवसांच्या घरी उपचारानंतर, आता धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे आणि ते हळूहळू बरे होत आहेत अशा बातम्या येत आहेत. चला या सध्या त्यांची प्रकृती कशी आहे आणि कोणती दक्षता घेण्यात येत आहे ते जाणून घेऊयात.

धर्म पाजींची प्रकृती आता कशी आहे?

धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आजारपणामुळे चर्चेत आहे. आता त्यांच्या प्रकृतीबद्दलची अपडेट समोर येत आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, धर्म पाजींची प्रकृती सध्या पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे वृत्त आहे. त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे, जी त्यांच्या चाहत्यांसाठी आणि कुटुंबासाठी चांगली बातमी आहे.

धर्मेंद्र यांना ३१ ऑक्टोबर रोजी श्वसनाच्या त्रासामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे त्यांच्यावर १० दिवसांहून अधिक काळ उपचार करण्यात आले. १० नोव्हेंबर रोजी अभिनेत्याची प्रकृती बिघडली. पण, धर्मेंद्र यांच्या चाहत्यांच्या प्रार्थनेमुळेच ते जीवन आणि मृत्यूच्या लढाईत मृत्यूला हरवून घरी परतले आहेत.

११ नोव्हेंबर रोजी धर्म पाजी यांचे निधन झाल्याच्या अफवा वेगाने पसरल्या. यावेळी, धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी आयशा देओल यांनी लगेचच या वृत्ताचे खंडन केले. त्यानंतर, ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकानेही धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shopping Markets : स्वेटर, कानटोपी, मफलर; कमी पैशांत बेस्ट व्हरायटी, मुंबईतील Winter शॉपिंग मार्केट

Maharashtra Live News Update: पुण्यात १ लाख रुपयांचा नायलॉन मांजा जप्त

Maharashtra Politics: निष्ठावान राहिलो ही आमची चूक होती का? पक्षातून हकालपट्टी होताच शिवसेना नेते ढसाढसा रडले

Surya Gochar: ग्रहांचा राजा सूर्य शनीच्या नक्षत्रात करणार प्रवेश; 'या' राशींच्या घरी येणार लक्ष्मी, सोन्यासारखे दिवस होणार सुरु

Post Meal Walking Benefit: जेवल्यानंतर १० मिनिटे चालल्यावर होतात जबरदस्त फायदे

SCROLL FOR NEXT