Chhaya Kadam: 'अभिमान आसा तुझो चेडवा...'; देवीच्या जत्रेसाठी कोकणातल्या गावी पोहोचली बॉलिवूड गाजवणारी ही मराठमोळी अभिनेत्री

Chhaya Kadam: बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमधील प्रभावी भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री छाया कदम नुकतीच आपल्या कोकणातील धामापूर या मूळ गावी पोहोचली आहे.
Chhaya Kadam
Chhaya KadamSaam tv
Published On

Chhaya Kadam: बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमधील प्रभावी भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री छाया कदम नुकतीच आपल्या कोकणातील धामापूर या मूळ गावी पोहोचली आणि तेथील प्रसिद्ध सातेरी देवी जत्रेला उपस्थित राहिली. जत्रेतील उत्साह, देवीची पालखी आणि गावकऱ्यांचा सहभाग पाहून छाया कदम भावूक झाली. तिने या जत्रेतील खास क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले असून ते सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत.

छाया कदम 'लापता लेडीज' ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘न्यूड’, ‘रेडू’ यांसारख्या चित्रपटांमधील ताकदवान भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहेत. मात्र, ग्लॅमरच्या जगात असूनही तिने आपल्या मुळांसोबत घट्ट नातं जपलेलं आहे. जत्रेत सहभागी होताना तिने गावकऱ्यांसोबत साधेपणाने पारंपरिक उत्सवाचा आनंद घेतला.

Chhaya Kadam
Green Tea: तुम्हाला खरचं वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी प्या हे टेस्टी ड्रिंक

जत्रेदरम्यान देवीची पालखी निघाल्यावर छाया कदमही गावकऱ्यांसोबत चालताना दिसली. कोकणातील पारंपरिक दशावतार हा लोककलाप्रकारही तिने जवळून पाहिला. व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावर दिसणारा अभिमान आणि आनंद चाहत्यांना विशेष भावला. सोशल मीडियावर तिच्या साध्या आणि सहज वागणुकीचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले असून अनेकांनी तिच्या “गावपणाला” अभिमानास्पद म्हटले आहे.

Chhaya Kadam
Janhvi Kapoor: जान्हवी कपूरचा ग्लॅमरस रॉयल लूक पाहिलात का?

आपल्या पोस्टमध्ये छाया कदम यांनी लिहिलेले शब्द विशेष लक्षवेधी ठरले, “सरंबळच्या सातेरीची जत्रा, देवीची पालखी, मामा मोचेमाडकरांचो दशावतार, गाव आणि मी.”
या एका वाक्यात त्यांनी गावाशी असलेले आपले प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त केला. चमकदार पडद्यापलीकडे त्यांचं अत्यंत साधं, भावूक आणि आपल्या मुळांना घट्ट पकडून ठेवणारं रूप प्रेक्षकांना पहायला मिळालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com