Saleel Kulkarni Won Best Regional Movie Instagram
मनोरंजन बातम्या

Saleel Kulkarni Post: “हा पुरस्कार तुमचा आहे...”, ‘एकदा काय झालं’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर दिग्दर्शकांनी‘या’ दोन व्यक्तींना दिले श्रेय

Saleel Kulkarni News: सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ चित्रपटालाही पुरस्कार मिळाल्यानंतर दिग्दर्शकांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी पुरस्काराचे श्रेय देत पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

Saleel Kulkarni Won Best Regional Movie

चित्रपट, साहित्य आणि कला या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो. नुकताच बुधवारी दिल्लीतल्या विज्ञान भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी मराठीसह, बॉलिवूड आणि टॉलिवूड सिनेसृष्टीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना पुरस्कार दिला. यावेळी सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ या चित्रपटालाही पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार मिळाल्यानंतर दिग्दर्शकांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी पुरस्काराचे श्रेय देत पोस्ट शेअर केली आहे.

यावर्षीचे राष्ट्रीय पुरस्कार अनेक मराठी चित्रपटांना मिळाले आहेत. त्यातीलच एक सलील कुलकर्णींचा ‘एकदा काय झालं’ चित्रपट. गायक आणि संगीतकार म्हणून आपली छाप प्रेक्षकांमध्ये सोडल्यानंतर त्यांनी सिनेविश्वामध्ये दिग्दर्शन क्षेत्रातून स्वतःची एक वेगळी छाप निर्माण करीत आहे. ‘एकदा काय झालं’ या चित्रपटातून सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांच्या पहिल्याच कलाकृतीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

‘एकदा काय झालं’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. आणि आपल्या आई- वडीलांना आणि त्यांच्या मुलांना त्याचे संपूर्ण श्रेय दिले. “हा पुरस्कार तुमचा आहे. अगदी माझ्या लहानपणापासून माझ्या पावलांना काही खुपू नये म्हणून माझ्या प्रत्येक पावलाखाली तिचा तळवा ठेवत आलेली माझी आई…आणि…ज्यांनी उद्याकडे बघायला कारण दिलं…ज्यांच्यामुळे प्रत्येक नवीन दिवस खऱ्या अर्थाने उजाडतो…ते शुभंकर आणि अनन्या” अशी पोस्ट शेअर दिग्दर्शक सलील कुलकर्णीने शेअर केली आहे.

‘एकदा काय झालं’या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत सुमित राघवन, उर्मिला कोठारे, मोहन आगाशे, सुहास जोशी, मुक्ता बर्वे, पुष्कर श्रोत्री ही दमदार स्टारकास्ट दिसून येत आहे. ‘एकदा काय झालं’ या चित्रपटात वडील आणि मुलाचं नातं अतिशय सुंदररित्या मांडलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT