Pooja Hegde Bought New Home  Instagram
मनोरंजन बातम्या

Pooja Hegde: पूजा हेगडेने मुंबईत खरेदी केलं अलिशान घर, किंमत वाचून व्हाल थक्क

Pooja Hegde Buy New Home: शेवटी हौशेला मोल नसते. असंच एका बॉलिवूड अभिनेत्रीलाही सीफेस घर हवं होतं आणि ते विकतही घेतलं आहे.

Chetan Bodke

Pooja Hegde Bought New Home

मुंबईत आपले हक्काचे घर असावं, असं प्रत्येकालाच वाटते. मुंबई शहर हे स्वप्नांची मायानगरी आहे. या मायानगरीमध्ये सामान्यांपासून, राजकीय मंडळी, बिझनेसमन त्यासोबतच अनेक सेलिब्रिटी राहतात. आपल्या हक्काच्या घरासमोर समुद्राचे सुंदर दृश्य असावे, असं अनेकांना वाटतं. शेवटी हौशेला मोल नसते. असंच एका बॉलिवूड अभिनेत्रीलाही सीफेस घर हवं होतं आणि ते विकतही घेतलं आहे. ही दुसरी तिसरी कोणीही नसून ऋतिक रोशनच्या ‘मोहनजोदडो’ चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या पूजा हेगडेने सीफेस नवं घर खरेदी केलेलं आहे.

कायमच आपल्या अभिनयामुळे आणि फॅशनमुळे फॅन्समध्ये प्रकाशझोतात राहिलेली पूजा सध्या तिच्या खासगी लाईफमुळे चर्चेत राहिली आहे. पूजा हेगडेने तिच्या वैयक्तिक आयुष्यात उंच भरारी घेतलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने मुंबईत स्वत:चं अलिशान घर खरेदी केलेले आहे. लवकरच अभिनेत्री या घरामध्ये शिफ्ट होईल. तिच्या घराची किंमत लाखो रूपये आहे. मुंबईतील वांद्रा परिसरामध्ये खरेदी केलेले घर ४ हजार स्क्वे.फूट इतके मोठे आहे. त्या घराची किंमत ४५ कोटी असल्याचं समजले जात आहे. (Bollywood Actress)

वांद्रा परिसरामध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींचे घरे आहेत. या परिसरामध्ये अनेक हाय प्रोफाईल माणसं आहेत. या सर्वांचेच घरं सीफेस आहेत. त्या प्रमाणेच पूजाचं घर देखील सीफेस आहे. पूजाने गेल्या वर्षी नवी कोरी अलिशान रेंज रोव्हर एसयूव्ही कार विकत घेतली होती. तिच्या त्या अलिशान कारची किंमत ४ कोटींच्या आसपास आहे. दरम्यान, पूजाने नवं घर खरेदी केल्याचे वृत्त चाहत्यांना कळताच, त्यांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. (Bollywood News)

पूजा हेगडेच्या कामाबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीचा ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामध्ये ती शेवटची दिसली होती. ‘मोहोंजोदारो’ या चित्रपटातून पुजाला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. त्यासोबतच पूजा ‘हाऊसफुल ४’, ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’, ‘सर्कस’ या चित्रपटातून पूजा हेगडे प्रकाशझोतात आली. पूजा आता लवकरच क्राइम थ्रिलर असलेल्या ‘देवा’ चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत शाहिद कपूर स्क्रीन शेअर करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

SCROLL FOR NEXT