नुकताच होळी हा सण पार पडला आहे. आता होळीत घडलेल्या अनेक घटनांची माहिती आता हळू हळू समोर येत आहे. मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनी देखील धुमधडाक्यात होळी पार्टी (Holi Party) केली आहे. मात्र या होळीच्या धामधुमीत एका एक अभिनेत्रीचा विनयभंग झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी मुंबईत ही घटना घडली आहे. अभिनेत्रीचा तिच्याच सहकलाकार अभिनेत्याने विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
होळीत ज्या अभिनेत्रीवर विनयभंग झाला आहे. ती मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका आणि सीरिजमध्ये काम केले आहे. तिने अनेक मुख्य भूमिका देखील केल्या आहेत. या अभिनेत्रीचे वय 29 वर्ष आहे. अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या कंपनीने आयोजित केलेल्या होळी पार्टीत तिच्यासोबत ही घटना घडली आहे. ही पार्टी कंपनीच्या टेरेसवर चालू होती. या पार्टीत तिचे अनेक कलाकार मित्र सहभागी होते. यात तिचा सहकलाकारसुद्धा उपस्थित होता. त्याचे वय 30 आहे.
अभिनेत्रीच्या सहकलाकाराने मद्यपान करून अभिनेत्रीसोबत गैरवर्तणूक केली आहे. असे तिने तक्रारीत म्हटले आहे. अभिनेत्रीने म्हटले की, "पार्टीमध्ये तो तो माझ्यावर आणि इतर स्त्रियांवर रंग टाकण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याला नकार दिला कारण मला त्याच्यासोबत होळी खेळायची नव्हती. मी तिथून निघून पाणीपुरीस्टॉलमागे लपले. पण तो माझ्या मागे आला आणि मला रंग लावण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा मी माझा चेहरा झाकला. मात्र त्याने जबरदस्तीने मला पकडून माझ्या गालाला रंग लावला.
पुढे अभिनेत्री म्हणते की, "तो म्हणाला की, 'माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुला माझ्यापासून कोण वाचवतो ते पाहतो मी...' त्यानंतर त्यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत रंग लावला. त्यानंतर मी त्याला ढकलले आणि वॉशरूममध्ये गेले. " असा धक्कादायक प्रसंग होळी पार्टीत अभिनेत्रीसोबत घडला.
अभिनेत्रीने हा प्रसंग तिच्या मित्रांना सांगितला. तेव्हा त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीसांनी आरोपी कलाकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पार्टीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे. पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांचे जबाब नोंदवण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.