Aaditi Pohankar : "त्यानं माझ्या छातीला..."; मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला दादर ट्रेनमधील धक्कादायक अनुभव, वाचून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

Aaditi Pohankar Life Incident : अभिनेत्री अदिती पोहनकरने तिच्या आयुष्यातील वाईट प्रसंग सांगितला आहे. हा प्रसंग तिच्यासोबत दादर ट्रेनमध्ये घडला. त्या वेळी अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडले जाणून घेऊयात.
Aaditi Pohankar Life Incident
Aaditi PohankarSAAM TV
Published On

सध्या देशभरात महिला सुरक्षिततेची चर्चा पाहायला मिळत आहे. महिलांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना ऐकायला मिळत आहे. अशात आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील तिला आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे. या अभिनेत्रीने सुपरस्टार रितेश देशमुखसोबत काम केले आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रितेश देशमुखच्या 'लय भारी' चित्रपटातल अभिनेत्री अदिती पोहनकर (Aaditi Pohankar) आहे.

अभिनेत्री अदिती पोहनकरने एका मिडिया मुलाखतीत आपल्या आयुष्यातील वाईट प्रसंग सांगितला आहे. तिने सांगितले की, "दादर स्टेशनला मी ट्रेनने प्रवास करत होते. मी फर्स्टक्लासच्या डब्ब्यात चढले. त्या डब्यात काही लहान शाळेची लहान मुले देखील होती. तेव्हा मी ११ वीत होते. माझ्या समोर एक मुलगा उभा होता. तेव्हा दादरवरून ट्रेन निघाल्यावर त्या मुलाने माझ्या छातीला हात लावला..."

पुढे अदिती म्हणाली, "ही घटना सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली. ही घटना घडली तेव्हा मी चांगल्या कपड्यामध्ये होती. मी शॉर्ट कपडे घातले नव्हते तर मी कुर्ता घातला होता. तेव्हा त्याच्या या कृत्याने मला धक्का बसला. त्यानंतर या घटनेची तक्रार करायला मी पोलीस स्टेशनला गेले. मात्र पोलिसांची प्रतिक्रिया ऐकून मी हादरले. "पोलीस म्हणाले की, तुम्हाला काही झाले तर नाही ना...आता त्या मुलाला कुठे शोधणार आम्ही?" असे बोलून त्यांनी माझ्या तक्रारीला उडवून लावले."

शेवटी आदिती म्हणाली," मला तो मुलगा पुन्हा स्टेशनला दिसला. तो मुलगा दुसऱ्या मुलीसोबत तेच करत असताना मी पोलीसांना घेऊन गेले. मात्र त्यानंतर पोलिसांनी आदितीला तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा पुरावा मागितला. तेव्हा आदिती म्हणाली,"त्याने माझ्यासोबत जर वाईट कृत्य केल आहे तर मला माहीत असणारच ना…" जेव्हा मी त्या मुलाकडे पोलिसांना घेऊन गेले तेव्हा त्याने सर्व आरोप फेटाळले. तेव्हा मी खूप चिडून मोठ्या आवाजत त्याच्याशी बोलू लागली. तेव्हा अखेर त्या मुलाने आपल्या कृत्याची कबुली दिली."

Aaditi Pohankar Life Incident
Zapuk Zupuk : 'एका बुक्कीत टेंगूळ...', गुलीगत सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाची पहिली झलक पाहिलीत का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com