मनोरंजन बातम्या

28 Years Later Trailer : भयानक सुरुवात, तितकाच भयंकर शेवट; 28 इअर्स लेटरचा ट्रेलर बघून थरकाप उडेल

28 Years Later Trailer : २८ इयर्स लेटर हा आगामी चित्रपट २८ डेज लेटर या चित्रपटाचा सिक्वेल आहे. डॅनी बॉयल दिग्दर्शित या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता सिलियन मर्फीची भूमिका असल्याचा चाहत्यांचा अंदाज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

28 Years Later : २८ इयर्स लेटर या बहूप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. डॅनी बॉयल दिग्दर्शित आगामी झोम्बी एपोकॅलिप्स चित्रपट 28 डेज लेटर या चित्रपटाचा सिक्वेल आहे. चित्रपटात जोडी कॉमर, ॲरॉन टेलर-जॉन्सन आणि राल्फ फिएनेस आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा झोंबीवर आधारित असल्यामुळे अभिनेता सिलियन मर्फी कदाचित त्याच्या मूळ चित्रपटातील व्यक्तिरेखा जिम म्हणून काम करत असल्याचा अंदाज या चित्रपटाचे चाहते वर्तवत आहेत.

अकादमी पुरस्कार विजेते दिग्दर्शक डॅनी बॉयल आणि अकादमी पुरस्कार-नामांकित लेखक ॲलेक्स गारलँड या चित्रपटाच्यानिमित्ताने तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आहेत. २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची टॅगलाइन "टाईम डिडन्ट हिल अनिथिंग" अशी ठेवण्यात आली असून या चित्रपटाच्या फ्रँचायझीमध्ये टेलर-जॉन्सन, कमर, राल्फ फिएनेस, एरिन केलीमन आणि जॅक ओ'कॉनेल आदी कलाकार समावेश आहे.तसेच अँड्र्यू मॅकडोनाल्ड आणि पीटर राइस गार्लंड आणि बॉयल देखील या चित्रपटात काम करणार आहेत. कोलंबिया पिक्चर्स, डीएनए फिल्म्स आणि डेसिबल फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने २८ इयर्स लेटरची निर्मिती केली आहे.

'२८ डे' चे रूपांतर २८ वर्षात झाले असल्याचे दिसत असून अजूनही परिस्थिती बदलली नसल्याचे या चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसत आहे. जवळपास दोन दशके झाली आहेत. एक भयानक विषाणू जैविक शस्त्रांच्या प्रयोगशाळेतून हरवल्यामुळे हा प्रकार घडला असून आता त्यावरील उपाय किती निर्दयपणे अंमलात आणला जात आहे हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने टिप्पणी केली, "शेतात उठणारा झोम्बी सिलियन मर्फीसारखा दिसत होता." तर, दुसऱ्याने लिहिले, “अरे व्वा…, पण, तो फारच भयानक सीन आहे. २००२ सालानंतर प्रदर्शित होणाऱ्या या भागाचे चाहते मोठ्या उत्सुकतेनं वाट पाहत होते. मात्र आता त्यांची ही प्रतीक्षा संपणार असून हा चित्रपट पुढील वर्षी २० जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election : २९ महापालिकेचा निवडणूक निकाल उशिराने लागणार? मोठी अपडेट समोर

Accident: महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, दोन कारची कंटेनरला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू, साताऱ्यातील दुर्दैवी घटना

Yellow Saree Designs: हळदीला नेसा पिवळ्या रंगाची साडी, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

Matar Paratha Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी मटार पराठा, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT