
मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी सध्या लग्नबंधनात अडकत आहे. अलिकडेच रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे लग्नबंधनात अडकली. यानंतर आता नवरा माझा नवसाचा 2 फेम अभिनेत्री हेमल इंगळे लवकरच लग्न करणार आहे. अभिनेत्रीच्या प्रीवेडींग कार्यक्रमांना नुकतीच सुरूवात झाली आहे. सोशल मीडियावर हेमलने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
अभिनेत्री हेमल इंगळे मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. हेमलची सध्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. नुकतंच हेमलचं केळवणाचा कार्यक्रम पार पडला याचदरम्यानचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अलिकडेच हेमलने तिच्या जवळच्या मैत्रिणीसह बॅचलर पार्टी केली हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. बॅचलर पार्टी आणि केळवणनंतर अभिनेत्रीच्या लग्नसोहळ्याची सर्वांना उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच अभिनेत्री हेमलने लग्न कधी आहे याबाबत सांगितले नाही.
कोण आहे हेमलचा नवरा?
हेमल बॉयफ्रेंड रौनक कोरडीयासोबत लग्न करणार आहे. रौनक ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करत आहे. हे दोघे बरेच दिवस एकमेकांना डेट करत होते अखेर या दोघांनीही लग्नाचा विचार केला आहे. सोशल मीडियावर या दोघांनीही एकमेकांचे फोटो पोस्ट केले आहेत. नेटकऱ्यांनी या दोघांच्या फोटोंवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
हेमल इंगळेच्या करिअबद्दल बोलायचं तर, हेमलने आसमधून तिच्या सिनेसृष्टीतल्या प्रवासाला सुरूवात केली. यानंतर ती अभिनय बेर्डेसोबत अशी ही अशिकी या चित्रपटात दिसली. नुकतंच रिलीज झालेल्या सचिन पिळगावंकर यांच्या नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटात देखील तिने काम केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.