Abhishek Bachchan: काय सांगता! ऐश्वर्या आणि अभिषेक दुसऱ्यांदा होणार आई- बाबा ? तो प्रश्न विचारताच म्हणाला...

Abhishek Bachchan : अभिषेक आणि ऐश्वर्या दुसऱ्यांदा आई- बाबा होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
Abhishek Bachchan-Aishwarya Rai
Abhishek Bachchan-Aishwarya RaiGoogle
Published On

बॉलिवूडची लोकप्रिय जोडी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. या दोघांच्या नात्यात काही अलबेल नसल्याचं बोललं जात होतं. अनेकदा सोशल मीडियावर हे दोघे वेगवेगळे स्पॉट झाले आहे मात्र या दोघांनीही कधीही नात्याबाबत अधिकृतपणे भाष्य केललं नाही. अशातच आता अभिषेक आणि ऐश्वर्या दुसऱ्यांदा आई- बाबा होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Abhishek Bachchan-Aishwarya Rai
Hashtag Tadev Lagnam: लग्नसराईचा उत्साह वाढवणारं 'हॅशटॅग तदेव लग्नम्’मधील गाणं प्रदर्शित;'सगळ्यांचा फोटो' गाणं देणार लग्नाच्या आठवणींना उजाळा

रितेश देशमुखच्या 'केस तो बनता है' या कार्यक्रमात अभिषेक बच्चन सहभागी झाला होता. यावेळी अभिषेकने त्याच्या पर्सनल टू प्रोफेशनल लाईफबाबात मत माडलं आहे. रितेशने अभिषेकला, अ अक्षरापासून सुरू होणारी नावे निवडण्याबाबत प्रश्न केला आहे. रितेश म्हणाला. अमिताभ जी, तू अभिषेक, पत्नी ऐश्वर्या, मुलगी आराध्या या सर्वांच्या नावाची सुरूवात 'अ' अक्षराने होते आहे. मग जया आंटी आणि श्वेता यांनी काय केलं? यावर अभिषेकने म्हणाला, हे त्यांना विचारावं लागेल. पण ती आमच्या कुटुंबाची एक परंपरा होत बनली आहे.

पुढे रितेशने अभिषेकला, 'आराध्यानंतर? यावर अभिषेक म्हणाला, नाही, पुढची पिढी आल्यावर बघू, यावर रितेश हसला आणि म्हणाला, एवढी कोण वाट पाहणार? पुढे अभिषेक म्हणाला वयाचा आदर कर, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. यानंतर रितेश अभिषेकला नमस्कार करतो. या दोघांच्या चर्चांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनने २००७ मध्ये लग्न केले आहे. या दोघांनाही आराध्या १३ वर्षाची मुलगी आहे. जिचं नाव आराध्या आहे. सोशल मीडियावर या परिवाराचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.

Abhishek Bachchan-Aishwarya Rai
Kiran Gaikwad: मुहूर्त ठरला! 'या' दिवशी वैष्णवी होणार किरणची नवरी, लग्नाची तारीख काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com