Kiran Gaikwad
Kiran GaikwadSaam Tv

Kiran Gaikwad: मुहूर्त ठरला! 'या' दिवशी वैष्णवी होणार किरणची नवरी, लग्नाची तारीख काय?

Kiran Gaikwad Wedding Date: सोशल मीडियाच्या माध्यमातून किरण गायकवाडने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. याचवर्षी म्हणजेच २०२४ मध्ये किरण लग्नबंधनात अडकणार आहे.
Published on

मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सध्या लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. नुकतंच 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेचं लग्न झालं यानंतर आता 'लागिरं झालं जी' फेम अभिनेता लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून किरण गायकवाडने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. याचवर्षी म्हणजेच २०२४ मध्ये किरण लग्नबंधनात अडकणार आहे.

Kiran Gaikwad
Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात पुन्हा मारामारी, अविनाश अन् दिग्विजयमध्ये नेमकं घडलं काय? पाहा VIDEO

नुकतंच किरणने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून लग्नाची तारीख सांगितले आहे. १४ डिसेंबरला किरण लग्न करणार आहे. निसर्गाच्या सानिध्यात या दोघांनीही ही व्हिडीओ बनवली आहे. मराठमोळ्या अंदाज दोघेही फारच सुंदर दिसत आहे.

किरण गायकवाड हा अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत या दोघांनी प्रेमाच्या नात्याची कबुली दिली. किरणने तो वैष्णवी कल्याणकर डेट करत असल्याचं सांगितलं. या दोघांनी त्यांचे प्रिवेडिंगचे फोटो पोस्ट केले आहेत.

पोस्ट करत दिली नात्याची कबुली

किरणने, “तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस; पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायच ठरवलं आहे “मंत्रिमंडळल्या बैठका होत राहतील ,मंत्री पद वाटत राहतील ,त्यांचं ठरतय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो… ही आहे माझी होणारी “होम मिनिस्टर” ! अशी पोस्ट केली होती.

Kiran Gaikwad
Pushpa 2 Box Office Collection Day 4: बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा'चा जलवा; वाचा संडे कलेक्शन

दोघांच्या कामाबद्दल बोलायचं तर, किरणने मराठी मालिका अन् चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लागिर झालं जी' आणि 'देवमाणूस' या मालिकेत काम केले आहे. मालिकेतील त्याच्या भूमिकेमुळे तो घराघरात लोकप्रिय झाला आहे. तर अभिनेत्री वैष्णवी, 'तू चाल पुढं', 'देवमाणूस 2' मध्ये होती. सध्या वैष्णवी 'तिकळी' या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com