
श्रुती कदम
२०२४ हे वर्ष हॉरर कॉमेडी चित्रपटांनी भरलेले आहे. यावर्षी हॉरर कॉमेडी चित्रपटांना उदंड प्रतिसाद मिळाला. अशातच या जॉनरचा चित्रपट करण्यात बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार कसा मागे राहणार? हॉरर कॉमेडी आणि अक्षय कुमार हे समीकरण फार जुने असून लवकरच अभिनेता अक्षय कुमार 'भूत बांगला' हा नवा चित्रपट प्रेक्षकांचं भेटीला घेऊन येणार आहे. अक्षय कुमारच्या या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरूवात झाली असली तरीही या चित्रपटासाठी प्रेक्षकांना अजून वर्षभराची प्रतिक्षा करावी लागणार.
चित्रपटाचं पोस्टर केलं रिलीज
अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून या चित्रपटाची माहिती दिली. भूत बंगला या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय पुन्हा एकदा त्याचे आवडते दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत काम करणार आहे. १० डिसेंबर २०२४ पासून 'भूत बांगला' या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून भीती आणि हास्याचा दुहेरी डोस प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
कधी प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा भूत बंगला
अक्षय कुमारने दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट २ एप्रिल २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड आणि केप ऑफ गुड फिल्म्स संयुक्तपणे या चित्राची निर्मिती करत आहेत. अक्षय कुमारने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो पांढरा धोतर-कुर्ता आणि वर थ्री-पीस जॅकेट घातलेला दिसत आहे. त्याने हातात दिवा धरला आहे.
अक्षय कुमार आणि प्रियदर्शन एकत्र दिसणार
अक्षय कुमारचे पहिले पोस्टर आणखीनच अप्रतिम होते. अक्षय कुमारच्या करिअरसाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि प्रियदर्शन १४ वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत. याआधी अक्षय कुमार ज्या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसला होता तो म्हणजे भूल भुलैया. त्यानंतर अक्षय आता या चित्रपटात झळकणार असल्यामुळे त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.