Madhurav Boru Te Blog At Maharashtra Sadan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Madhurav Boru Te Blog At Maharashtra Sadan: दिल्लीच्या तख्तावर रंगणार मराठमोळं नाटक, महाराष्ट्र सदनात होणार ‘मधुरव बोरु ते ब्लॉग’चा खास प्रयोग

Madhurav Boru Te Blog 25th Show At At Maharashtra Sadan: दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात ‘मधुरव बोरु ते ब्लॉग’ या नाटकाचा २५ वा रौप्य महोत्सवी प्रयोग येत्या ३ ऑगस्टला होणार आहे.

Chetan Bodke

Madhurav Boru Te Blog At Maharashtra Sadan: "राजभवन", "गेट वे ऑफ इंडिया" अशा ऐतिहासिक वास्तूमध्ये सादर केला गेलेला एकमेव मराठी नाट्य प्रयोग "मधुरव बोरु ते ब्लॉग" आता थेट दिल्ली येथे सादर होणार असून त्याचे निमित्त ही ख़ास आहे .

"मधुरव बोरु ते ब्लॉग" चा २५ वा (रौप्य महोत्सवी) प्रयोग दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे येत्या ३ ऑगस्टला सायंकाळी ६:३० वाजता होणार असून दिल्ली मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मराठी भाषेच्या जन्माची संगीतमय कहाणी! मराठी भाषेचा जन्म कसा झाला,मराठी भाषेचा रंजक इतिहास आणि त्यातली वेगवेगळी स्थित्यंतरे मधुरा वेलणकर आणि तिचे सहकलाकार नाट्य, नृत्य, संगीत या मनोरंजनाच्या माध्यमातून या कार्यक्रमातून सादर करतात. (Marathi Actress)

ज्या मराठीतून आणि ज्या मराठीसाठी आपण भांडलो,लढलो,एकत्र आलो त्या "मराठी" भाषेवरचा हा एकमेव नाट्यप्रयोग!मराठी भाषेतला किंवा मराठी नाट्य क्षेत्रातला हा एक अभिनव प्रयोग इतक्या मर्यादित दृष्टीने या कार्यक्रमाकडे न पाहता, मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळावा यासाठी मराठीची माहिती, मराठीची महती कळावी आणि मराठी वरचं प्रेम, मराठीचं कौतुक आणि मराठीचा अभिमान लोकांमध्ये जागृत व्हावा यासाठी उचललेले एक पाऊल आहे आणि ते यशस्वी होत आहे हे गेल्या २४ प्रयोगांच्या अनुभवांवरून दिसून येत आहे. अनेक जणांनी मराठी वाचायला,लिहायला,बोलायला सुरूवात केली आहे हा या कार्यक्रमाचा सकारात्मक परिणाम. (Theaters)

भाषेविषयीच्या अनेक माहीत नसलेल्या गोष्टी कलेच्या माध्यमातून या कार्यक्रमांमध्ये उलगडत जातात त्यामुळे हा कार्यक्रम महत्वपूर्ण ठरतो म्हणून प्रेक्षकांनी जाणकारांनी प्रसार माध्यमांनी ह्या कार्यक्रमाचे कौतुक केलं आणि ह्या पुढेही कृतिशील पाठिंबा आणि प्रोत्साहन देत रहायला हवं. हा गौरव आपल्या मराठीचा आपल्या मातृभाषेचा आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा आहे. (Marathi Film)

या कार्यक्रमाचे उत्तरोत्तर भरपूर प्रयोग व्हावे, जिथे जिथे मराठी माणूस आहे त्यांच्या मनामध्ये मराठी विषयी प्रेम निर्माण व्हावं यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचून हा कार्यक्रम करण्याची इच्छा मधुरा वेलणकर साटम, अभिजीत साटम तसंच या कार्यक्रमाची लेखिका डॉक्टर समीरा गुजर आणि या कार्यक्रमातले कलाकार जुई भागवत, आकांक्षा गाडे, आशिष गाडे, श्रीनाथ म्हात्रे यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

SCROLL FOR NEXT