Nora Fatehi : नोरा फतेही दिल्लीच्या पटियाला कोर्टात हजर, नेमकं काय आहे प्रकरण?

Nora Fatehi News : नोरा फतेहीने नुकतीच मनी लॉड्रिंग केससंदर्भात दिल्लीच्या पटियाला कोर्टात हजेरी लावली आहे.
Nora Fatehi
Nora Fatehi Saam Tv

Nora Fatehi Sukesh Chandrashekhar Money Laundering : नोरा फतेही(Nora Fatehi) ही डान्सरसोबतच उत्तम अभिनेत्रीही आहे. नोरा नेहमीच अभिनय आणि डान्समुळे चर्चेत असते. परंतु नोरा आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नोराने नुकतीच मनी लॉड्रिंग केससंदर्भात दिल्लीच्या पटियाला कोर्टात हजेरी लावली आहे.

सुकेश चंद्रशेखरच्या (Sukesh Chandrashekhar)मनी लॉड्रिंग प्रकरणी नोरा संशयित आरोपी आहे. या प्रकरणात नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यापासून नोराची या केससंदर्भात चौकशी होत आहे. नोरा मनी लॉड्रींग प्रकरणामुळे अडचणीत आली आहे.

Nora Fatehi
Ashok Saraf : 'कृतज्ञ मी, कृतार्थ मी' अशोक सरफांचा दिलदारपणा; ज्येष्ठ रंगकर्मींना प्रत्येकी ७५ हजार रुपयांची मदत

काही महिन्यांपासून सुकेश चंद्रशेखरमुळे नोरा अडचणीत आली आहे. त्यामुळे तिची ईडीने चोकशी सुरू आहे. या प्रकरणी नोराला कोर्टानं समन्स बजावल्याचे कळत आहे. याच पाश्वभूमीवर कोर्टात हजर राहण्याचे आदेश तिला दिले आहेत.

एनएनआयनं केलेल्या ट्विटनुसार नोरा दिल्लीच्या पटियाला कोर्टात हजर झाली आहे. सुरेश चंद्रशेखरनं केलेल्या दोनशे कोटींच्या मनी लॉड्रिंग प्रकरणी नोराचा सहभाग असलेला संशय पोलिसांना आहे. त्यामुळे नोराची चौकशी सुरू केली आहे. सुकेशनं अटक झाल्यानंतर तिहार जेलमधून अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नाव घेतल्याची चर्चा होती. या प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोराचा तपास केला जात आहे.

आज, नोरा सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या मनी लॉड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात गेली. यादरम्यान नोरा काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली.तिच्यासोबत आणखी काही लोकही दिसले.

तिहार जेलमध्ये असणाऱ्या सुकेश चंद्रशेखरला भेटण्यासाठी अनेक बॉलिवूडमध्ये अभिनेत्री गेल्या होत्या.असं म्हटलं जात आहे. यादरम्यान, सुकेशनं नोरा फतेहीबाबत खुलासा केला होता.

सुकेशनं जॅकलीनला लाखो रुपयांचे गिफ्ट दिले होते ही गोष्ट तपासातून समोर आली आहे. महागड्या भेटवस्तु, कपडे, दिले होते. केवळ जॅकलीनलाच नाहीतर तिच्या घरच्यांना देखील त्यानं दिलेल्या वस्तुंविषयी ईडीनं चौकशी केली होती.त्यामुळे या प्रकरणात नोरा आणि जॅकलिन चांगल्याच अडकल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com