Ashok Saraf : 'कृतज्ञ मी, कृतार्थ मी' अशोक सरफांचा दिलदारपणा; ज्येष्ठ रंगकर्मींना प्रत्येकी ७५ हजार रुपयांची मदत

Ashok Saraf News : अशोक सराफांनी ज्येष्ठ कलाकारांना मदत करण्याचे मोठं पाऊल उचललं आहे. या उपक्रमासाठी अशोक सराफांना साथ देण्यासाठी अनेक लोक पुढे सरसावले आहे.
Ashok Saraf
Ashok Saraf Saam Tv
Published On

Ashok Saraf Felicitated Artist : मराठी चित्रपटसृष्टीतील ९० चा काळ गाजवलेला बहुरुपी कलाकार म्हणून अशोक सराफांना ओळखले जाते. अशोक सराफांनी आजपर्यंत खूप उत्कृष्ठ अशी भूमिका साकारली. अशोक सराफांचे त्यांच्या आयुष्यावरील मी बहिरुपी पुस्तक प्रकाशित झाले आहे.

त्यांच्या या पुस्तकातून आलेल्या पैश्यांनी ज्येष्ठ कलाकारांना मदत करण्याचे मोठं पाऊल उचललं आहे. या उपक्रमासाठी अशोक सराफांना साथ देण्यासाठी अनेक लोक पुढे सरसावले आहे.

कलाकाराला कलाकराची जाण असते. हे अशोक मामांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे. अभिनय क्षेत्रात त्यांना मदत केलेल्या सहकालाकार किंवा पडद्यामागील कलाकार ज्यांना मदतीची गरज आहे आणि जे या वयात काम करु शकत नाही त्यांना मदतीचा हात पुढे करत २० कलाकारांना प्रत्येकी ७५ हजार रुपये मदत म्हणून दिले आहेत.

Ashok Saraf
Disha Vakani Comeback : दयाबेन पुन्हा येतेय भेटीला, तारक मेहताच्या निर्मात्यांची मोठी घोषणा, पण...

'कृतज्ञ मी कृतार्थ मी' अशी भावना मनात घेऊन हा कार्यक्रम शनिवारी २९ जुलैला पार पडला. कार्यक्रमात अशोक मामांनी अनेक कलाकारांना मदत केली.

'कृतज्ञ मी,कृतार्थ मी' कार्यक्रमात अशोक सराफांनी सर्व कलाकार आणि पडद्यामागील कलाकारांचे आभार मानले. 'मला कशा आणि कुठल्या शब्दात सांगू काळात नाहीये. मी माझ्या जीवनाचा प्रवास जेव्हा सुरू केला तेव्हा हे लोक माझ्यासोबत होते. ज्यांनी मला कळत नकळत हेल्प केली. कळत नकळत माझ्यासाठी झटले.

माझ्या कला जीवनात माझ्या जडणघडणीत त्यांचा अप्रत्यक्षपणे उपयोग झाला आहे. या माणसांना काहीतरी भेट द्यावी म्हणून मी हे केलं. आमच्या कुटुंबाकडून त्यांना ही भेट आहे. आम्ही कुटुंबीयांनी त्यांना भेट दिली आहे . त्यांनी ती जपून ठेवावी. यामुळे त्यांना काही मदत होत असेल तर आम्हाला खूप आनंद आहे' अशा भावना अशोक सराफांना व्यक्त केल्या.

Ashok Saraf
Gashmeer Mahajani Ask Me Anything: ‘तुझ्या कठीण काळात मराठी सेलिब्रिटींना मदत केली का?’ उत्तर देत गश्मीर महाजनी म्हणाला...

'ही आयडिया माझी नव्हती, निवेदिताला हे पहिलं सुचलं. ती म्हणाली, आपले पैसे येतील ना तेव्हा असं असं करूया. मी घाबरलो पहिल्यांदा. कारण हे म्हणणं सोपं असत पण करणं कठीण असतं. हे करण्यासाठी आमच्यामागे लोक उभे राहिले यासारखं भाग्य नाही. बँकेचे लोक उभे राहिलेच.

माझा सख्खा मावस भाऊ अनिल खवटे जो सध्या गोव्याला असतो. त्याची कंस्ट्रक्शन कंपनी आहे गोव्याला. तो सतत माझ्या मागे असतो. या लोकांनी मला खूप सपोर्ट केला. त्यामुळे मी यासाठी नाही म्हणूच शकलो नाही. परंतु हे काम कसे करायचे असा विचार होता. त्यासाठी ही सर्व धुरा माझ्या लहान भावाने सुभाष सराफने अंगावर घेतली. अनेकजण सतत माझ्या मागे होतेच की तुम्ही काहीतरी करा. तुम्ही फक्त उभे राहा आम्ही सर्व करतो ना. अशी आत्मीयता या सर्वांनी दाखवली. त्यामुळे हे सर्व उभ राहिलं आहे. या लोकांना मी कधीच विसरु शकणार नाही.

माझ्या करिअरमध्ये अनेक लोकांनी मला हेल्प केली आणि आता हे लोक मला हेल्प करत आहेत. त्यामुळे मी लोकांसमोर हे सादर करु शकलो . किंवा दाखवू शकलो की, माझ्या मनात काय आहे ते. खरं म्हणजे हे सर्व करुन मी खूप मोठं काम केले असं मी म्हणणार नाही. परंतु काहीतरी हातभार माझ्याकडून लागला. त्याने मी खरंच कृतज्ञ होतो. यामुळे जर त्यांना खरंच आनंद मिळत असेल तर मी कृतज्ञ झाल्यासारख मला वाटलं थॅंक्यू, थॅंक्यू..'या शब्दात आपल्या पाठी उभे असणाऱ्या लोकांचे अशोक मामांनी आभार मानले.

अशोक मामांचे हे पाऊल पाहून इंडस्ट्रीतील अनेक लोक असे काम करतील. काही दिवसांनी सरकारदेखील या कामाची दखल घेतील. अशी भावना अशोक सराफ, पत्नी निवेदिता सराफ आणि भाऊ सुभाष सराफ यांना व्यक्त केली.

Ashok Saraf
Chandramukhi 2 Update : कंगना रनौतच्या 'चंद्रमुखी 2'विषयी मोठी अपडेट ; सुपरस्टार रजनीकांतला दाक्षिणात्य अभिनेत्याने केलं रिप्लेस

'कृतज्ञ मी,कृतार्थ मी' कार्यक्रमात एकूण २० कलाकारांना सन्मानित करत त्यांना मदत केली. उपेंद्र दाते (अभिनेते), बाबा (सुरेश) पार्सेकर (नेपथ्यकार-प्रकाशयोजनाकार), अर्चना नाईक (अभिनेत्री), वसंत अवसरीकर (अभिनेते), दीप्ती भोगले (गायिका-अभिनेत्री), नंदलाल रेळे (ध्वनिसंयोजक), अरुण होर्णेकर (दिग्दर्शक-निर्माते),प्रकाश बुद्धिसागर (दिग्दर्शक),

पुष्पा पागधरे (पार्श्वगायिका), वसंत इंगळे (अभिनेते), सुरेंद्र दातार (संयोजक-निर्माते), किरण पोत्रेकर (लेखक-दिग्दर्शक), शिवाजी नेहरकर (लोकनाट्य कलावंत), हरीश करदेकर (नाट्यकलावंत), सीताराम कुंभार (नेपथ्य व्यवस्थापक), विष्णू जाधव (नेपथ्य साहायक), एकनाथ तळगावकर (नेपथ्य साहायक), रवींद्र नाटळकर (नेपथ्य साहायक), विद्या पटवर्धन (अभिनेत्री), उल्हास सुर्वे (नेपथ्य साहायक) या कलाकारांना मदत करण्यासाठी अशोक मामा पुढे सरसावले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com