youth fighting at rajwada satara  Saam Digital
क्राईम

शांतताप्रिय साताऱ्यात नेमकं चाललंय तरी काय? Video Viral

youth fighting at rajwada satara : सातारा पाेलिस दलाने घटनेतील युवकांचा शाेध सुरु केला आहे. अद्याप काेणावरही गुन्हा दाखल नसल्याची माहिती समाेर आली आहे.

ओंकार कदम

सातारा शहरातील राजवाडा या वर्दळीच्या ठिकाणी युवकांच्या दोन गटात राडा झाला आहे. या राड्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून सध्या व्हायरल हाेऊ लागला आहे. हा व्हिडिओ पाहून शातंताप्रिय साता-यात नेमकं चाललयं काय अशा भावना नागरिक व्यक्त करु लागले आहेत.

साता-यातील राजवाडा परिसर हा शहरवासियांसह जिल्ह्यातील नागरिकांचे आवडता परिसर. या परिसरात गाेलबाग, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उद्यान आदी विरंगुळ्याची ठिकाणे आहेत. या परिसरात खाद्य पदार्थ विक्रेत्यांचे गाडे देखील असता. यामुळे या परिसरात कायम वर्दळ असते.

प्रतापसिंह उद्यान येथे दाेन गटात वाद झाला. या वादाचे रुपांतर मारामारीत झाले. यामुळे परिसरात बघ्यांची गर्दी जमली. हा घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडिओ पाहून नागरिक पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा करु लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : दिल्लीमध्ये वाहतुकीत मोठा बदल, २२ प्रमुख मार्गांवर निर्बंध, ६ मेट्रो स्थानके बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Sleeping : रात्रभर पंखा चालू ठेवून झोपताय? आजच बदला 'ही' सवय, शरीराचे होतेय गंभीर नुकसान

CJI Surya Kant : सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा इंडिया आघाडीला भेटीस नकार, पाहा काय दिलं कारण

SCROLL FOR NEXT